Posts

Showing posts from November, 2021

पेड(गजल)

गजल ------- कहते रहते हैं ,पेड़ कितना कुछ जैसे पेड़ नहीं, हो किताब कोई एहसान फरामोश इंसान जैसा सारी दुनिया में कोई भी नहीं । हालत जमीन की,आबोहवा की हुई बदतर कैसे? क्या जानता नहीं कोई? अपने ही पैर पर मारता कुल्हाड़ी जानता है मानता है पर,क्या संभलता है कोई? गुलिस्ता दुनिया का, दास्तां दिलों की पेड़ोंसे ही दरबदर नजर आती है मगर सिकुड़ते पत्तों के दर्द भरे अल्फाज क्या सुनता है कोई ,क्या समझता है कोई? बचाने वालों का हो खैर मकदम वरना दुनिया की कोई खैर नहीं जो मान ले किताब इन दरख्तों को उन जैसा समझदार कोई भी नहीं ।

जाणीव पर्यावरणाची...

Image
जाणीव पर्यावरणाची... ''आता हे सगळ्याना करायलाच लागतय.'' (पर्यावरण कार्यकर्ता आणि कार्य उन्नती) शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासोबत झालेल्या संवादाचे समालेखन,25 नोव्हेंबर 2019 ( विषय सूची:- पार्श्वभूमी...पर्यावरण पूरक माणूस...पर्यावरण प्रेमी माणूस...पर्यावरण योद्धा...पर्यावरण प्रेरणा आणि प्रेरक माणूस...पर्यावरण शिक्षण-प्रशिक्षण...पर्यावरण नेतृत्व)         पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीतच आहे. सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे आणि प्रत्येक दिवशी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे तीन ऋतु आज आपण अनुभवत आहोत. असे पूर्वी नव्हते. शेतीचे प्रचंड नुकसान होते आहे. महत्प्रयासाने जें उत्पन्न येथे आणि, ते खाऊन आपले आरोग्य फार सुरक्षित होते असे चित्र नाही. शारीरिक आजारा बरोबर मानसिक आजारांचे सुद्धा थैमान माजले आहे. आपल्या काम करण्याच्या शारीरिक व मानसिक तसेच सामाजिक व आध्यात्मिक क्षमता सुद्धा नको इतक्या खालच्या स्तरावर गेल्या आहेत. पूर्वी पन्नास-शंभर वर्षातून एखादा महापूर एखादा दुष्काळ असायचा .आता तो आपल्या पाचवीलाच पुजला आहे...

वफा

वफा ------- वफादारी की कोई कीमत ही नही "बेवफाई" करने को दिल करता है । "चालाक" लोग जानते हैं हमारी फितरत को  थोड़ा उन्हें चौंका दें ,ऐसा दिल करता है । कब तक सहते रहे वफादारी का ' मजाक' यूं भर दे अपने जख्मोंको दिल करता है । रूह से यह सुना ना गया और आवाज आई... तू कर ना सकेगा ,यह जो तेरा "दिल" करता है । तू अपने जख्मों को छोड़ ,औरों के जख्म भरता जा तेरी जिंदगी का यही फलसफा ,खुद को "खुद"  बनाता जा। पलभर की रोशनी के लिए घर नहीं जलाता कोई अपने घर की कर दे सफाई और आराम से सो जा । तुम “ तुम ”ना रहो तो क्या रह गया? तुम्हारे मौत पर मातम करेगा कौन ? जो कर नहीं सकता ,वह क्यों है सोचता? वफा तु "अपने आप" से क्यों नहीं करता?  - मनोज पाटिल ( दिनांक 9.11.21)

संयुक्त उपचार - एक गरज, एक अपूर्व संधी!

कोरोनाचा हाहाकार संपूर्ण जगामध्ये माजला. त्याचा प्रतिकार करण्याची अनेकाची पद्धत निराळी. काही लोकांनी नवनवीन पद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी प्राप्त झालेल्या प्रोटोकॉल ला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना अनेक अनुभव आले परंतु या वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांना खूप काही शिकविले. आपण जर नाही शिकले तर आपण माणूस कसले? एकदा का ब्लड प्रेशर वाढला तर आयुष्यभर गोळी खावी लागणार या संकल्पनेने ब्लड प्रेशर या परिस्थितीबद्दल अनावश्यक भय निर्माण केले आणि त्या भयामुळे अनावश्यक गुंतागुंत रोग्यामध्ये वाढू लागली. मग ब्लड प्रेशर मॅनेज करणे कदाचित सोपे असेल पण ही गुंतागुंत मात्र भलती अवघड ,नाही का ? यकृताचा आजार झाला तर बऱ्याचदा आयुर्वेदिक औषधाकडे वळतात आणि त्याचा लाभ ही चांगला होतो. पण यकृताचा आजार ओळखण्याचे तंत्रज्ञान मात्र आधुनिक उपचार पद्धतीच्या मदतीने कमालीचे सोपे आणि खात्रीचे झालेले त्याला पाहायला मिळते. इथे आपण दोन उपचार पद्धतींचे एकत्रितपणे लाभ घेत असतो. कधी कधी कुठे कुठे आणि कसे कसे लाभ घेऊ शकतो याचा अभ्यास नको का व्हायला? आपल्या वैद्यकीय व्यवस्थेचा हेतू रोगी व्यक्तीची रोगमुक्ती...

संयुक्त चिकित्सा सहयोगी चिकित्सा)

( संयुक्त उपचार भाग )  संयुक्त उपचार म्हणजे सहाय्यक उपचार! एकापेक्षा अधिक उपचार पद्धतींचे एकमेकांना सहाय्यक होणे.कधी पेशंटना तात्काळ उपचार आराम पडण्याची आवश्यकता असते. कधी पेशंटना औषधाचे साइड इफेक्ट पासून वाचवावे लागते. "वाचवावे लागते " म्हणजे एखादवेळेस त्या पेशंटला विशिष्ट औषधांची हाइपर्सेंसितिविटी रिॲक्शन येत असते. आणि एखादे वेळी उपचरातून होणारे साइड इफेक्ट ,आजारा पेक्षा घातक असू शकतात. मग अशावेळी सामान्य पणे साईड इफेक्ट चा त्रास कमी होईल अशा प्रकारची औषधे मूळ आजाराच्या औषधी बरोबर दिली जाऊ शकतात. पण दोन चार दिवसाचा उपचार असेल तर हे ठीक आहे.तेही टाळता आले तर बरेच आहे. पण खूप काळ चालणारा उपचार असेल तर, किती औषधे खावी लागणार बरे?यामुळे औषधाचा खर्चही वाढू शकतो आणि त्या दुसऱ्या औषधांनाही काही साईड इफेक्टस् असू शकतात.  एकूणच औषधे तात्कालिक द्यावयाची व्यवस्था असावी. ठराविक उपचारानंतर आजार बराच झाला पाहिजे. काही आजार असाध्य असतात असे मानले जाते. त्याला आयुष्यभर औषध घ्यावे लागते. अन्य उपचार पद्धतीमध्ये तो आजार घालवण्याची सोय असेल तर आयुष्यभर आणि अपायकारक औषध एका घ्यावीत बरे?  मा...

संयुक्त उपचार : होमिओपॅथी आणि कॅन्सर

( सहलेखक:- डॉ. सतीश कुलकर्णी) कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची अनिर्बंध वाढ. सामान्यपणे शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशीं,  जुन्या पेशींची जागा घेतात. हे काम अत्यंत नियंत्रितपणे आणि क्रमाक्रमाने होत असते. पण कधीकधी आवश्यकता नसतानासुद्धा पेशींचे विभाजन आणि वाढ होऊ लागते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. असे होण्यामध्ये जनुकांचा व्यवहार कारणीभूत ठरतो.  जनुकांचा व्यवहार बिघडण्यास साठी अनेक बाह्य, अभ्यंतर, शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्व घटकांचा परिणाम होतो असे हळूहळू संशोधनामध्ये सिद्ध होत आहे. होमिओपॅथीमध्ये 'कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज ' दिल्या जातात.  माणसांच्या आवडीनिवडी, स्वभाव, सवयी, शारीरिक, मानसिक लक्षणे, पूर्वी झालेले आजार, कुटुंबातील आजार या सगळ्यांचा विचार करून औषधाची निवड करण्याची पद्धत आहे. त्यामुळे होमिओपॅथी संयुक्त उपचाराचा भाग म्हणून खरोखरच कॅन्सरच्या बाबतीत अत्यंत संयुक्तिक सिद्ध होते. हा सगळा नॅनोटेक्नॉलॉजी चा भाग आहे. होमिओपॅथीची कार्यपद्धती न्यानो टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याचे दिसून येते . अत्यंत सूक्ष्म स्वरूपात मूळ औषधाचा अंश उपलब्ध असतो. औषधाचे ...

रुग्णाची तपासणी आणि संयुक्त उपचार

रुग्णावर उपचार करावयाचे तर त्याच्या आजाराचे निदान करावे लागते. आजार कोणता आहे ?हे ओळखण्यासाठी रुग्णांची तपासणी केली जाते. सर्व प्रकारच्या उपचार पद्धती मध्ये तपासण्याच्या पद्धती सुद्धा विकसित झालेल्या आहेत. त्या त्या काळाच्या वैशिष्ट्ये नुसार आणि त्या-त्या वैद्यांच्या योग्यतेनुसार रुग्णांच्या तपासण्या होत असतात. होमिओपॅथी मध्ये रुग्णाच्या इतिहास तपासणीला अत्यंत महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये दर्शन, स्पर्शन आणि स्पर्श या पद्धतीने रुग्णाला तपासले जाते.या व्यतिरिक्त नाडी, जिव्हा ,शब्द ,स्पर्श ,नेत्र ,आकृती, मूत्र आणि मल या आठ परीक्षासुद्धा सांगितल्या आहेत. आधुनिक विज्ञान पद्धतीमध्ये सुद्धा इंटररोगेशन, ऑस्कल्टेशन, पाल्पेशन परकशन अशा पद्धतींचा समावेश झालेला आहे .त्या सर्व एकमेकाशी बऱ्याच अंशी मिळत्याजुळत्या सुद्धा आहेत. त्यांना क्लीनिकल एक्झामिनेशन म्हणतात. त्यामध्ये सर्व पॅथी मानवाला शक्य असलेल्या ,पाच इंद्रियांच्या माध्यमातून जे पाहणे शक्य आहे आणि पाहून, त्याचा अर्थ लावणे शक्य आहे, त्यावरून आजार आणि आजाराची तीव्रता ओळखतात. त्यामध्ये कोणताही भेद असण्याचे कारण नाही. लेखाच्या सुरुवातीला काळाचा उ...

संयुक्त उपचार आणि पोस्ट कोविड

कोविडचे उपचार संयुक्त उपचार पद्धतीने करत असताना आणि केल्यानंतर चार गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. ऍलोपॅथी उपचारा बरोबर आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी याचा वापर केला असता... कोविडच्या उपचारांमध्ये सोपेपणा आला, रोगाचा त्रास कमी झाला ,उपचाराचा खर्च कमी झाला आणि पोस्ट कोविड त्रास जवळ-जवळ झालेच नाहीत. सुरेश पाटील, वय 55 वर्षे (नाव बदलले आहे) यांना कोविड झाला असे समजले त्या दिवशी रविवार होता. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये कुटुंबियांचा फोन आला. ''घाबरू नका, स्वच्छ मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश याचे सेवन करा. युट्युब वर 'सूक्ष्मयोग' आहे त्याच्या लिंक पाठवतो त्यानुसार व्यायाम करा. आवश्यकता पडली तर लक्षणाप्रमाणे एखादे औषध घ्या उद्या सकाळी आपण पाहूया." असे त्यांना सांगितले. तथापि नातेवाईकांच्या दबावामुळे रुग्णालयांमध्ये जाऊन ऍडमिट झाले. पाच दिवसांच्या उपचारानंतर जेव्हा परत आले तेव्हा छातीची तपासणी केल्यावर असे लक्षात आले की छातीमध्ये क्रेपिटेशन जसेच्या तसे आहेत. फक्त ताप थांबला आहे आणि मनातून भीती नष्ट झाली आहे. चेहऱ्यावर सूज होती. थोडी धाप लागत होती. त्यांना ऍलोपॅथीची औषधे बंद करावयाच...

सम्मान करनेवाले सभी को समर्पित

सेवा से शांती मिलती है साहब शोहरत से डर लगता है । फुल खिलता है तो  खुशबू चारो को चली जाती है। भौंरे भी आ जाते है सहजही रंग भी कुछ खास होते है। पर चार ही दिन मे ... पंखुडीया अलग होती है। धीरे धीरे कालक्रमसे मिट्टी का तन मिट्टी मे मिल जाता है । यह एहसास जब तक जीवित है सेवा का आनंद मिलता है। सेवा से शांती मिलती है साहब शोहरत से डर लगता है । भला हो... भला हो  सम्मान करने वालों का। सम्मान करने की भावना सेवा करने के भाव जिवीत रखती है समाज में निरंतर । अच्छे गुण बहुत लोगों में होते हैं सब का सम्मान हो यह संभव नहीं। गुणों को देखने की नजर बहुत कम लोगों में होती है। फूलों में रंग,गंध और मकरंद हो यह कुदरत की देन है। आपने हमें में अच्छा देखा यह तो आप की ही देन है। हमारा अपना कुछ भी नहीं दोस्तों सेवा में आनंद आता है। सेवा से शांती मिलती है साहब शोहरत से डर लगता है । ( दि.1-7-2021)

चला भांडू या!

भांडणाची चवदार भाजी करून खाऊया. चला भांडूया चला भांडूया चला भांडूया! मनातून सदा कुढावे कशाला ? आपलाच मित्र, बोल सडेतोड त्याला. चुकला असेल तो वा चुकशील तूही  भांडून मैत्री घनघट्ट करावयाला.. घरात ही व्हावा संवाद सदा हा मत मांडण्याचे स्वातंत्र्य सर्वाजणांना पद्धत मांडणीची वेगळी प्रत्येकाची चिंता घराची एकमेकांची ,ती व्यक्त व्हावयाला... प्रकल्प कसा पूर्ण होतो हे तसे गूढ आहे थोडी नियोजने ,थोडी लवचिकता कधी तेथेही भांडण्याला स्थान थोडेफार आहे परि साधूया हासत ध्येयपूर्णतेला... सदा देशात असती मत-मतांतरे ही मंथनाने नवनीत हवे काढावयाला ठामपणे मांडायचे वास्तविकतेला वैरत्व नसावे ,जगू जग समृद्ध करावयाला मैत्रीत्व,बंधुत्व ,राष्ट्रीयत्व हेच साध्य आहे 'भांडण ' त्याचे केवळ एक साधन व्हावे. थांबवू नये कदापि प्रगतीच्या गतीला तुटण्या इतके कधीही नको ताणावयाला भांडण्यासाठी तरी एकत्र येऊया, एकत्र येऊया, एकत्र राहूया. भांडणाच्या मर्यादा भांडणाचे फायदे समजून उमजून सारे आणू उपयोगाला...

एक प्रयोग, अनेक अनुभव.सर्वच उपयुक्त!

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त सामाजिक व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन सांगलीमध्ये ई-कचरा संकलन आणि जागृतीसाठी मोहीम सुरू केली. त्याचा पहिला टप्पा १५ आगष्ट २०२१ रोजी अपेक्षेपेक्षा अधिक यश देऊन गेला.31 ऑक्टोबर 2021 ला दुसरा टप्पा पूर्ण झाला.  तिसरा आणि चौथा टप्पा २०२२ मध्ये 26 जानेवारी आणि पाच जून रोजी पूर्ण करावयाचा आहे. त्याला अपेक्षित यश मिळावे म्हणून.... झालेल्या दोन मोहिमांमध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित हा अनुभवसंकलनाचा लेखन-प्रपंच! ई वेस्ट म्हणजे नेमके काय ? ई-वेस्ट नावाची काही तरी गोष्ट आहे, हे लोकांना बर्‍यापैकी समजू लागले आहे. संस्थचा अभिनिवेश इतका टोकाचा का असतो? हे गूढ मात्र उलगडत नाही ."आपण पर्यावरणासाठी काम करतो", असे म्हणतो .मग आपला अभिनिवेश संस्थेपुरता का राहतो? आपल्या संस्थेचे नाव येत असेल तरच काम करणार... मला पूर्वीपासून विचारात घेतले असेल तरच काम करणार... अमुक एकाला तुम्ही बरोबर घेतलेले आहे तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करणार नाही.... वगैरे वगैरे... अठराशे सत्तावन चा प्रसंग आठवतो... इंग्रजांच्या प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण देश कधी एक झालाच ना...