संयुक्त उपचार : होमिओपॅथी आणि कॅन्सर
( सहलेखक:- डॉ. सतीश कुलकर्णी)
कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची अनिर्बंध वाढ. सामान्यपणे शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशीं, जुन्या पेशींची जागा घेतात. हे काम अत्यंत नियंत्रितपणे आणि क्रमाक्रमाने होत असते. पण कधीकधी आवश्यकता नसतानासुद्धा पेशींचे विभाजन आणि वाढ होऊ लागते, त्याला आपण कॅन्सर म्हणतो. असे होण्यामध्ये जनुकांचा व्यवहार कारणीभूत ठरतो.
जनुकांचा व्यवहार बिघडण्यास साठी अनेक बाह्य, अभ्यंतर, शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्व घटकांचा परिणाम होतो असे हळूहळू संशोधनामध्ये सिद्ध होत आहे. होमिओपॅथीमध्ये 'कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज ' दिल्या जातात.
माणसांच्या आवडीनिवडी, स्वभाव, सवयी, शारीरिक, मानसिक लक्षणे, पूर्वी झालेले आजार, कुटुंबातील आजार या सगळ्यांचा विचार करून औषधाची निवड करण्याची पद्धत आहे. त्यामुळे होमिओपॅथी संयुक्त उपचाराचा भाग म्हणून खरोखरच कॅन्सरच्या बाबतीत अत्यंत संयुक्तिक सिद्ध होते.
हा सगळा नॅनोटेक्नॉलॉजी चा भाग आहे. होमिओपॅथीची कार्यपद्धती न्यानो टेक्नॉलॉजीवर आधारित असल्याचे दिसून येते . अत्यंत सूक्ष्म स्वरूपात मूळ औषधाचा अंश उपलब्ध असतो. औषधाचे प्रमाण अत्यंत अल्प असले तरीही शक्तीकृत (पोटेन्शियट) केलेले असल्यामुळे माणसाच्या चैतन्यशक्ती वर काम करते आणि अत्यंत योग्य पद्धतीने नैसर्गिक रित्या आजारावर मात करण्यास मदत करते.
कॅन्सर या आजाराची भीतीच इतकी मोठी असते की तो आजार आपल्याला झाला आहे असे समजल्यावरच रुग्ण निम्मा खचून जातो. त्यात शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिएशन सारख्या उपचाराचे दुष्परिणामही अपरिहार्यच आहेत.मानसिकदृष्ट्या खचलेल्या अशा रुग्णाला जर कोणती सोपी उपचार पद्धती मिळाली ,त्याचे मन प्रसन्न राहिले ,उपचार पद्धतीमधील औषधे त्याच्या आरोग्यावरही परिणाम करू लागली तर प्रचलित उपचाराला सुद्धा फायदाच होईल . म्हणून सर्व परिस्थितीचा अभ्यास करता संयुक्त उपचार पद्धती आता स्वीकारायलाच हवी.
अनेक पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये किमोथेरपी टाळण्याकडे कल दिसू लागला आहे किमोथेरपी चे दुष्परिणाम कमी करणे हे तिच्या संशोधनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनलेला आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेली होमिओपॅथी ची पद्धती आपल्या गुणतत्त्वामुळे रुग्णांच्या खिशाला चाट न बसता ,उपयुक्त ठरत असेल तर का वापरू नये बरे?
जगात होमिओपॅथीच्या उपचाराचे फायदे यांच्या अनुभवावरून काढलेल्या निष्कर्षानुसार कॅन्सरच्या पेशींची वाढ आणि निर्मिती यावर नियंत्रण आणता येते, हे सिद्ध झाले आहे. रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा होणे, प्रतिकार शक्ती मध्ये वाढ होणे आणि त्यातून त्यांची जगण्याची आशा निर्माण होणे आणि ते सुद्धा अजिबात त्रासदायक नसलेल्या उपचार पद्धतीमुळे! हे रोग निवारणामध्ये निश्चितच सहाय्यभूत ठरू शकते.
कितीक रुग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रियेनंतर च्या तक्रारी रुग्णांमध्ये असणारी अस्वस्थता मंद झालेली भूक ,कमी झालेली कार्यक्षमता याच्या मध्ये सुधारणा झालेले दिसून आलेले आहे. त्यामुळे हळूहळू या उपचार पद्धतीला भक्कम अशी लोक मान्यता मिळू लागली आहे. अतिशय सुरक्षित साधी व निसर्गाला अनुरूप अशी ही उपचार पद्धती आपल्या आसपास सुद्धा अनेक लोकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. होमिओपॅथीचे उपचार तात्काळ उपचार करण्यासाठी झाल्यानंतर लगेच ऑपरेशन च्या वेळेला अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा करण्यात येतो.
डॉ रॉबर्ट कूपर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असे लिहिले आहे," रुग्णामध्ये सुधारणा दिसण्यासाठी ज्या कारणांमुळे रुग्णांना त्रास होतो ,अशा कारणांना टाळायला हवे,त्रास कमी करणारी उपचार पद्धती स्वीकारली पाहिजे."
तशी उपचार पद्धती उपलब्ध असेल तर का बरे स्वीकारू नये?
शस्त्रक्रिया, किमोथेरपी आणि रेडिएशन्स मुळे जेव्हा रुग्ण बरा न होता उलट त्याच्या व्याधी वाढत जातात तेव्हा डॉक्टर/ वैद्य सुद्धा निराश होतो. काही लोकांना ती व्यवसायिक दृष्ट्या संधी वाटत असली तरीही सज्जन डॉक्टरांची जगामध्ये कमतरता नाही .त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल ? याची कल्पना कोणीही करू शकेल. असे डॉक्टर्स उघडपणे नाही पण हळुवारपणे अन्य उपचार पद्धतीचा आधार घेण्याचे सुचवितात असे आपल्याला पाहायला मिळते.
बर्याचदा रूग्णसुद्धा स्वतःहून अन्या उपचार पद्धती कडे वळतात आणि त्याचा त्यांना त्यांची जीवनमान सुधारणे मध्ये फायदा होतो असे आपल्याला दिसून येते. असे लाभ झालेले अनेक रुग्ण आपल्या सगळ्यांना माहिती असतात. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर मायलो डीसप्लास्टिक सिन्ड्रोम या आजारांमध्ये किमोथेरपी अथवा रेडिएशन काहीही न घेता केवळ होमिओपॅथीने लाभ झालेले आम्ही स्वतः अनुभवलेले आहे. त्याशिवाय स्तन कॅन्सरची अनेक उदाहरणे आहेत. कीमोथेरेपीचे दुष्परिणाम जाणवायला लागले म्हणून ,भूक कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे ,तोंड कडू पडणे , कशातही उत्साह न वाटणे अशा तक्रारी अगदी काही दिवसांमध्ये होमिओपॅथी मुळे कमी झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. "आता आपले आयुष्य जास्तीत जास्त सहा महिनेच राहिले आहे", अशा प्रकारची भविष्यवाणी केलेले रुग्ण सुद्धा अपरिहार्यपणे अन्य उपचार पद्धती कडे वळतात आणि कित्येक वर्षे जगतात हेही आपल्याला पाहायला मिळते.
आता अलीकडे एक उपचार पद्धती जिचे 'स्टेम सेल थेरपी' नाव आहे, साधारण त्याच प्रकारची उपचार पद्धती होमिओपॅथी मध्ये सुरुवातीपासूनच सांगितली जाते तिला समज समाय समाय अंती सिमिलिया - सिमीलीबस - क्यूरेंटर याला तर होमिओपॅथी चा आधारभूत सिद्धांत मानला आहे. या पद्धतीचा पूर्वग्रह न धरता, द्वेष न करता उपचारांमध्ये उपयोग केला तर मानवजातीवर अनंत उपकार होतील यात शंकाच नाही!
Comments
Post a Comment