Posts

Showing posts from April, 2024

मातीसाठी गाणे

लललै ललै ललै,लललै ललै लैलै। लालै ललै ललै,लललै ललै ललै।।  जादू असेही माती बिजास फळ बनविती। पाण्यास शोषून घेती पाणी नदीस देती ।।  उन्हात सावली ती पक्षास घरटीही ती। सर्वास आधार जी ती त्या वृक्षास आधार देती।।  आरोग्य तिचे बिघडले आहो आमचेच चुकले। निर्धार सुधारणेचा करती तिचीच बाळे।।  आसमंतात विष वाढले जी त्यालाही शोषून घेती। त्या मातीस पोसती जेजे मज प्रिय मित्र ते ते।। पॉलिथिन रसायनांनी  प्रदूषण नित्य होते|  ते टाळा रे मुलांनो! आई सदा विनविती|| भोगार्थ शोषणाचे  अजस्त्र प्रयोग होती| रक्षणार्थ त्यागाचे कित्ते किती गिरवती? ( माती नसे ही माता असे   त्यातच आपले विश्व वसे   मनी आपल्या जाणीव ठसो   माती मातीचा विजय असो!)

खिलाडी

खिलाडी खिलाडी जब भी गिरता ,है वह एक खेल होता है। अनाडी जब भी गिरता है ,वह हादसा हो जाता है। हादसा भी "खेल" हो सकता है, बशर्ते... गिरने वाला "खिलाडी' होना चाहिए। दु:ख -सुख,हार-जीत तो आते रहते है जिंदगी में। कोई रोता ही रहता है, कोई हंस के निकल जाता है। जीवन भी खेलसा हो सकता है, बशर्ते... जिने वाला खिलाडी होना चाहिए । कडवी बात कभी 'सीख' देती है, कभी चिढा देती है। मिठी बातभी कभी "मरहम" होती है या फंसा देती है। हर बातका एक "खेल" हो सकता है बशर्ते... सुनने वाला " खिलाडी" होना चाहिए। कभी कोई मिल जाता ,है या कोई खो जाता है। हर वक्त आना जाना लगा रहता है जगत में। सफर का मजा तो आ सकता है, बशर्ते... आदमी को "मुसाफिर"जैसा होना चाहिए।

करंज

Image
जसा जसा उन्हाळा  कडक होत जातो, आणखीनच निखरत जातं रस्त्याकडेचं हिरवं सोनं! चकित करतं मनाला कसं येतं ऐन वेळेला? हवं तसं रूप घेऊन ते करंज्याच लेणं. उन्हाळ्याच्या रखरखीत हे गारव्याच गाणं . शांत करतं मनाला  रूप त्याचं देखणं. अरे,हिरव्याचे सुद्धा रंग किती वेगळे वेगळे! एकापेक्षा एक सरस असे पाचूचे सोहळे . आणखी काही दिवसांनी येतात जांभळी पांढरी फुले ! हिर्यानी आणि मोत्यांनी जणु शालूला सजवले. नववर्षाच्या स्वागताला  पडे चांदण्यांचे सडे. गूढ त्यांचे कसे  कोणालाच ना कळे. मनाला थंड करणारं झाड  आता फळ देऊ लागतं. तरुणपणातल्या धडपडीनंतर जणु प्रौढ शहानपण येतं. फळांमध्ये बीज स्निग्ध औषधी गुण त्याचे फार. त्वचेसाठी, पिकासाठी  गुराढोरांसाठी वरदान. पण हल्ली थांबायला  जरा वेळ नाही कुणाला. तरी जागा हवी असते गाडी आपली ठेवायला. सावलीच देणं पाहून किती जणांना आठवतं? आणखी अशी झाडे आपण नकोत का लावायला? आणखी अशी झाडे आपण नकोत का लावायला? वैद्य मनोज पाटील वर्ष प्रतिपदा,2024.