Posts

Showing posts from January, 2023

अशी ही एक विकासवाट!

Image
अशी ही एक विकासवाट! प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करत असताना या विषयाचा विचार करणे एक विशेष अवचित्यपूर्ण काम आहे. सर्वांगीण विकास व्हावा याच हेतूने आपण लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती स्वीकारली. "सर्वांगीण विकास" म्हणत असताना प्रथमदर्शनी आर्थिक उन्नती एवढाच भास होतो. पण आर्थिक उन्नती जेव्हा होते,व्यक्तीचे... तसेच कुटुंबाचे आणि तसेच समाजाचे... तेव्हा आपली सामाजिक उन्नती व्हावी असे प्रत्येकाला वाटते. या व्यतिरिक्त विकृती आणि विषमता आहे, ती नष्ट व्हावी आणि सर्वांना समान संधी आणि साधने मिळावीत याचीही गरज भासते. सामाजिक उन्नती होण्यासाठी समाजातील सर्व व्यवहार व्यवस्थितपणे चालावेत... यासाठी शैक्षणिक उन्नतीची सुद्धा आवश्यकता आहे. परंतु शिक्षणाने केवळ पदवी प्राप्त व्हावी, ही अपेक्षा आता पुरेशी ठरत नाही. शिक्षणाने 'शील' प्राप्त व्हावे, 'कौशल्य' प्राप्त व्हावे, शिक्षणाने अंगभूत असलेली कला अधिक विकसित व्हावी, या अपेक्षा सुद्धा सहजपणे आपल्या नजरेसमोर होता येतात. 'विद्या विनयेन शोभते' ही सुद्धा आपली एक अपेक्षा आहे. शील, विनय, आदर्श,श्रेष्ठता हे सर्व शिक्षणाने प्रा...