Posts

Showing posts from October, 2020

जनरल प्र्याक्टिशनर

संकटाच्या समयाला मनुष्याला उपयोगी पडते ती त्याची अंगभूत शक्ती ,त्याचे कौशल्य, त्याचा आत्मविश्वास, त्याची निर्णयक्षमता, जीवन उद्दिष्टा विषयीची त्याची मनोभूमिका! बाहेरून मिळालेली मदत अथवा उसणी मागवलेली शक्ती यांची सुद्धा मदत होऊ शकते,परंतु त्याला खूप मर्यादा असतात. जसे मनुष्याचे तसेच समाजाचे! संकटाच्या वेळेला समाजामध्ये कोणती अंगभूत शक्ती आहे? शक्तीचे काय वैशिष्ट्य आहे? त्या शक्तीला जागृत करण्याची कार्यपद्धती आहे? झालेल्या का शक्तीला वापरण्याचे कौशल्य काय आहे?  म्हणजे अधिकाधिक परिणाम  कारक पणे संकटाचा सामना करता येईल?  हे समजणे म्हणजे खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य असे म्हणता येईल. "योजकस्तत्र दुर्लभ" म्हणतात, ते यामुळेच!          कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आज प्रकर्षाने स्मरण होते आहे की आरोग्यावर आक्रमण करणाऱ्या  आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला  बाधित करणाऱ्या या शत्रूला ठरवायचे असेल तर सार्वजनिक प्रयत्नांबरोबरच अधिक महत्त्वाचे आहेत वैयक्तिक सहभाग आणि तो वैयक्तिक सहभाग मिळवण्यासाठी त्याच क्षेत्रातील (वैद्यकीयक्षेत्रातील) प्रत्येक कुटुंबाची...

कोरोनामुक्ती नंतर रूग्णांसाठी

 कोरोनाचे भय हळूहळू कमी होऊ लागले आहे. वैद्यक शास्त्राच्या प्रत्येक घटकाला नवा आत्मविश्वास प्राप्त होऊ लागला आहे. लोकांनी सुद्धा कधी काय करायचे कधी काय करायचे नाही याचे धडे घेतले आहेत. आता रुग्णालया मधले बेड मोकळे राहू लागले आहेत.  पॉझिटिव रुग्णांची संख्या क्रमाक्रमाने खाली  येत आहे. मृत्यूचा दर सुद्धा पूर्वीपेक्षा कमी होत आहे.  असे झाले... म्हणजे कोरोनाचे संकट टळले, असे मात्र नाही. याहून स्वस्तात उपचार करता येतील का? याहून लवकर उपचार करता येतील का?  कोरडा रूग्णांच्या मृत्यूचा दर शून्यावर आणता येईल का? कोरोना ने आपल्याला जे धडे शिकवले ते आत्मसात करता येतील का? त्यातून काही स्थाई विकासाची मुल्ले अमलात आणता येतील का?  जा व्यवस्था आणि प्रक्रिया यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाले ते तसेच टिकवता येतील का? अशा अनेक प्रश्नांची होकारार्थी उत्तरे आपल्याला शोधायची आणि अमलात आणायची आहेत.  एक तातडीचा प्रश्न आहे पोस्ट कोवीड लक्षणे शारीरिक बदल आणि त्यांचे उपाय. पोस्ट कोवीड म्हणजे कोवीड इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर होणारे शरीरातील बदल त्यामुळे  निर्माण होणारी लक्षणे आ...