चला भांडू या!
भांडणाची चवदार भाजी करून खाऊया.
चला भांडूया चला भांडूया चला भांडूया!
मनातून सदा कुढावे कशाला ?
आपलाच मित्र, बोल सडेतोड त्याला.
चुकला असेल तो वा चुकशील तूही
भांडून मैत्री घनघट्ट करावयाला..
घरात ही व्हावा संवाद सदा हा
मत मांडण्याचे स्वातंत्र्य सर्वाजणांना
पद्धत मांडणीची वेगळी प्रत्येकाची
चिंता घराची एकमेकांची ,ती व्यक्त व्हावयाला...
प्रकल्प कसा पूर्ण होतो हे तसे गूढ आहे
थोडी नियोजने ,थोडी लवचिकता कधी
तेथेही भांडण्याला स्थान थोडेफार आहे
परि साधूया हासत ध्येयपूर्णतेला...
सदा देशात असती मत-मतांतरे ही
मंथनाने नवनीत हवे काढावयाला
ठामपणे मांडायचे वास्तविकतेला
वैरत्व नसावे ,जगू जग समृद्ध करावयाला
मैत्रीत्व,बंधुत्व ,राष्ट्रीयत्व हेच साध्य आहे
'भांडण ' त्याचे केवळ एक साधन व्हावे.
थांबवू नये कदापि प्रगतीच्या गतीला
तुटण्या इतके कधीही नको ताणावयाला
भांडण्यासाठी तरी एकत्र येऊया,
एकत्र येऊया, एकत्र राहूया.
भांडणाच्या मर्यादा भांडणाचे फायदे
समजून उमजून सारे आणू उपयोगाला...
Comments
Post a Comment