डॉ सुधांशु त्रिवेदी ( संसदेमध्ये झालेल्या भाषणातील काही मुद्दे आणि थोडे विश्लेषण)
डॉ सुधांशु त्रिवेदी ( संसदेमध्ये झालेल्या भाषणातील काही मुद्दे आणि थोडे विश्लेषण) -वैद्य मनोज पाटील, सांगली. दिनांक 6 एप्रिल 2025. काही भाषणे 'मास्टरपीस' म्हणता येतील अशी असतात. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे पंडित नेहरू यांचे भाषण, 1965 च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळी लालबहादूर शास्त्री यांनी दिलेले भाषण, पहिल्या पोखरण चाचणीच्या यशानंतर माननीय इंदिरा गांधी यांचे भाषण,माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडले तेव्हाचे आणि दुसऱ्या पोखरण चाचणीच्या वेळचे त्यांचे भाषण, माननीय चंद्रशेखर यांच्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी दिलेले श्रीयुत प्रमोद महाजन,सुश्री सुषमा स्वराज यांचे भाषण, भारतीय संघराज्याचा काश्मीर एक अविभाज्य भाग आहे असा एकमताने ठराव झाला तेव्हाचे डॉक्टर करण सिंग यांचे भाषण, ,2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयामध्ये केलेले भाषण.... अशा मास्टरपीस भाषणांच्या मालिकेमध्ये डॉक्टर सुधांशू त्रिवेदी यांचे वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाच्या वेळी केलेले भाषण नमूद करावे लागेल. ...