Posts

Showing posts from December, 2023

जो महसूस हो रहा है..।

नजर के सामने जो नज़ारे हैं  उन्हें देखकर महसूस होता है अब जीने के तरीके बदलने होंगे। बड़े-बड़े अस्पतालों में जाकर  जिंदगी की सारी कमाई लुट जाती है  हमें मरने के तरीके बदलने होंगे। धरती को लूटा है बेतहाशा अब तक आनेवाली नस्लोंकी जिंदगी बेहाल है  अब जिंदगी के तरीके बदलने होंगे। एहतियात के लिए बने इंतेजामात और मजहब में दलाल बढ़ गए हैं   अब बंदगी के तरीके बदलने होंगे। नई दुनिया के नए साधन नई सोच  नागुजीर है पुराने लोगों के लिए  क्या पुराने तजुर्बे अब भूलने होंगे ? कोई सुनने को तैयार नहीं आजकल अक्ल कम दूरियां ज्यादा बढ़ रही हैं अब कहने के तरीके बदलने होंगे।

कालाय तस्मै नमः।

कालाय तस्मै नमः। संपूर्ण जगामध्ये किती प्रकारचे घटक आहेत ? याचे वर्गीकरण अनादिकालापासून आपल्या संस्कृतीने आपल्यासमोर ठेवले आहे‌. जीवसृष्टी आहे ,सजीव सृष्टी आहे.या सृष्टीतील प्रत्येक घटकाला गाडीच्या एक्सेलरेटर प्रमाणे गतिमान करणारी शक्ती आहे तशीच ब्रेकप्रमाणे मर्यादित करणारी शक्ती आहे.प्रत्येक घटकाला गमनागमन करण्यासाठी अवकाश पुरवणारी शक्ती आहे, तसेच त्या गमना गमनाचा लेखाजोखा ठेवणारी "काळ" ही एक शक्ती आहे.      "काळ" ही शक्ती ही आपल्या कर्तृत्वाचे मोजमाप करणारी मोजपट्टी आहे. या मोजपट्टीवर जे टप्पे आहेत, त्या मोजपट्टीवर आपण किती प्रगती केली?कोणत्या टप्प्यावर कोणत्या चांगल्या गोष्टी आपण पाहिल्या? कुठे वाईट गोष्टी घडल्या? त्यातून आपण काय शिकलो? की आपण काहीच शिकलो नाही? त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहिलो का? याच परीक्षण करण्याची संधी "काळ" आपल्याला देत असतो.      सहा ऋतू, बारा महिने ,बारा राशी, 27 नक्षत्रे, संवत्सर पासून युग आणि पल्यपर्यंतची कालमापनाची समृद्ध परंपरा आपल्याला प्राप्त झाली आहे. बारा महिन्याचे एक वर्ष, दशक आणि शतक हे अलीकडे अधिक प्रचलित असले...

बातम्यांच्या पलीकडले... (अधिसभा बैठकीचा हृद्य वृत्तांत)

Image
बातम्यांच्या पलीकडले...  (अधिसभा बैठकीचा हृद्य वृत्तांत)     अधिसभेचे सत्र संपायला रात्रीचे सव्वानऊ वाजले. सत्र संपत असताना माननीय कुलगुरूंनी " सर्वांच्या साठी भोजनाची व्यवस्था केली आहे" असे सांगितले आणि "कोणीही भोजन न करता जाऊ नये." असे प्रेमळ आग्रहाचे निवेदन सुद्धा केले. तशी भोजनाची आवश्यकता होतीच!पण तिथे गेल्यानंतर जे वातावरण निर्माण झाले होते ते पाहून त्याची खूपच आवश्यकता होती असे अशीच जाणीव झाली. सन्माननीय कुलगुरू प्रकुलगुरु,कुलसचिव आणि त्यांचे सर्व अधिकारी घरच्या कार्यक्रमाचे यजमान असल्याप्रमाणे सर्व अधिसभा सदस्यांचे स्वागत करायला उभे होते. सर्वजण जेवायला बसल्यानंतरच ते जेवायला बसले.      त्यांच्यामध्ये पालकत्व दिसले, गुरुजीं ज्या पद्धतीने वर्गामध्ये कठोर असतात आणि बाहेर आल्यानंतर अत्यंत मृदू व प्रेमळ असतात, तसे ते भासत होते. ज्यांनी सभागृह गाजवले त्यांच्यात कसलाही अहंकार अथवा अविर्भाव आता अजिबात दिसत नव्हता. ज्यांच्यामुळे सभागृहाला थोडाफार त्रास झाला असेल, ते प्रसंग आता सर्वजणच विसरून गेलेले दिसत होते.भोजनाचा मेनू सुद्धा साधा सुटसुटीत होत...