गणित कुठं तर चुकतं आहे.
गणित कुठं तर चुकतं आहे. आपल्या नाकातलं शेंबूड काढायला प्रत्येक वेळी कोणीतरी कुणालातरी बोलावतं आहे.गणित कुठे तरी ... समाजाचे प्रश्न समाजातच सुटावेत. अशी व्यवस्था समाजातच असावी. पण विशेष व्यवस्था बनवल्या आम्ही तीच समाजालाच नाडवत आहे.गणित कुठेतरी ... कुणाची समस्या कोणीतरी मांडतो सोडवायला कुठलीशी एजन्सी नेमतो हाही दुकान मांडतो, तोही दुकान मांडतो दुकानदारांचंच नाणं चलतं आहे. गणित कुठेतरी ... कुंपणानं शेत खावं, असं का व्हावं? चारित्र्याचे नाणं का झाकळून जावं? कर्तव्याची पूर्ती विसरून गेलो आम्ही जे ते अधिकाराचीच भाषा बोलतं आहे.गणित कुठेतरी... शरीराचं कसं छान चालतं एकेक अवयव आपलं आपलं काम करतं. सृष्टी अन् शरीराकडून शिकायचं सोडून सारे प्रदूषित नि रोगग्रस्त बनतं आहे .गणित कुठेतरी ... कुठे चुकतंय समजून घ्यावं. समजंल तिथं दुरुस्त करावं. स्वतःपासून सुरू करावं. छिद्रान्वेषी कशाला असावं? गणित इथेच तर चुकत आहे.गणित इथेच तर चुकतं आहे.