Posts

Showing posts from June, 2025

समीक्षा सारांश

पुस्तकाचे नाव :- संवाद  लेखिका :- चेलनादेवी खुरपे प्रकाशक :- मेनका प्रकाशन प्रकाशन हस्ते :- डॉ. तारा भवाळकर.        'संवाद' हे चेलनादेवी खूरपे मॅडम यांच्या लेखांचा संग्रह असलेले पुस्तक आहे, ज्यामध्ये विविध भूमिकांमधील (कन्या,विद्यार्थिनी, शिक्षिका, गृहिणी, आई, आजी, ) स्त्रींचे अनुभव, विचार आणि भावनांचे चित्रण आलेले आहे. हे संवाद म्हणजे पिढी दरपिढी होणारी विचारांची देवाणघेवाण, गावांमधली आपुलकी, नात्यांमधला जिव्हाळा आणि समाजातील व सहकार्यांमध्ये असलेली आत्मीयता...यांचा सुंदर प्रवास आहे.       पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेखन हे अत्यंत प्रामाणिक आहे, अनुभवसंपन्न करणारे आहे. अत्यंत प्रेरणादायी आहे. ते जिज्ञासू वृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देते. विशिष्ट काळातील समाजाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना माहिती देते. शिक्षक पेशा स्वीकारणाऱ्यांना प्रेरणा देते. शिक्षकांचा आदर करण्याची सामान्य जनतेला प्रेरणा देते. तरुणांना प्रेरणा देते. वृद्धांना प्रेरणा देते.      लेखिक...

"संवाद" या पुस्तकावरून...(2)

       ' संवाद' हे पुस्तक लेखांचा संग्रह आहे. प्रस्तुत लेखांमध्ये संवाद एका शिक्षिकेचा आहे... संवाद एका गृहिणीचाआहे... संवाद एका आईचा आहे... संवाद एका आजीचा आहे... संवाद एका विद्यार्थिनीचा आहे... विद्येच्या ग्रहणासाठी आणि विद्येच्या प्रदानासाठी बंडखोरी करणाऱ्या एका कन्येचा आहे... "संवाद" या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे, "संवाद म्हणजे विचारांची आणि भावनांची देवाण घेवाण, माणसा माणसांची मन जोडणारा एक पूल!बदलत्या काळामध्ये संवादाचे रूपच पालटलं,तिथे खऱ्या अर्थाने व्यक्त संवादातून निर्माण होणाऱ्या आपुलकी,जिव्हाळा,आत्मविश्वास यांचा चित्रपट म्हणजे संवाद हे पुस्तक!   'संवाद' असे या पुस्तकाचे नाव आहे. पण त्यांनी जे जे विषय त्यामध्ये हाताळले आहेत त्या विषयांचा अभ्यासू विवेचन त्यांच्या लेखांमध्ये आढळतं. ". संवाद फक्त संवाद नको, तर तो सुसंवाद असावा, संवादात नम्रता असावी ,जिव्हाळा असावा, आपुलकी असावी ,विश्वास असावा ,प्रामाणिकपणा असावा ,गोडी असावी, भावुकता असावी" असं त्या स्वतः लिहितात आणि त्यांच्या लेखनामध्ये ते सर्व दिसून येतात. त्या अर्थाने संव...

"संवाद" या पुस्तकावरून...(1)

       ' संवाद' हे पुस्तक लेखांचा संग्रह आहे. प्रस्तुत लेखांमध्ये संवाद एका शिक्षिकेचा आहे... संवाद एका गृहिणीचाआहे... संवाद एका आईचा आहे... संवाद एका आजीचा आहे... संवाद एका विद्यार्थिनीचा आहे... विद्येच्या ग्रहणासाठी आणि विद्येच्या प्रदानासाठी बंडखोरी करणाऱ्या एका कन्येचा आहे... "संवाद" या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे, "संवाद म्हणजे विचारांची आणि भावनांची देवाण घेवाण, माणसा माणसांची मन जोडणारा एक पूल!बदलत्या काळामध्ये संवादाचे रूपच पालटलं,तिथे खऱ्या अर्थाने व्यक्त संवादातून निर्माण होणाऱ्या आपुलकी,जिव्हाळा,आत्मविश्वास यांचा चित्रपट म्हणजे संवाद हे पुस्तक!"      लेखिका आदरणीय चेलनादेवी खूरपे मॅडम यांच्याबद्दल पुस्तकाच्या सुरुवातीला  शिकलगार सरांनी परिचय दिलेलाच आहे  लेखिकेचं दिलखुलास व्यक्तिमत्व प्रत्यक्ष  भेटल्यानंतर प्रत्येकालाच प्रचितीला येतं, त्याचं चित्रण त्यांनी खूप यथार्थपणे केलेलं आहे. त्यांचे वरिष्ठ या नात्याने त्यांना दिलेला 'वरदहस्त' त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या क्रिएटिव्हीटीबद्दल प्रोत्साहन दे...

प्रयास और प्रशासन

Image
प्रयास और प्रशासन के बीच प्रलंबन और प्रताड़ना क्यों है? प्रेमसे प्रभावित प्रयास हर बार हारता क्यों है? प्रयास सफल हो इसलिए, बना है ना प्रशासन? प्रमाणिक प्रयास के प्रति, इतनी कठोरता क्यों है? "प्रयास की होती है जीत", "प्रशासन संवेदनशील" पुस्तकों में लिखा तो है मगर, कार्यालय में अदृश्य क्यों है? पैसे,पद,या हो कोई प्रताडक... कर सकता प्रभावित प्रशासन. सात्विक प्रयास का हर काम, प्रलंबित क्यों है? "लोकसेवक" होकर भी, लोगों को ही प्रताडीत करते l मिलने को भी समय न मिलता, किस काम में व्यस्त रहते ? जागृत हो प्रशासन में कोई तो सुरमा! कर्तव्य निभानेवाले इतने विरले क्यों है? प्रयास और प्रशासन के बीच प्रलंबन और प्रताड़ना क्यों है?

थोडा तरी वेळ द्या.

एक वेदना प्रसवाची  भोगण्या तरी वेळ द्या. किमान कविता तरी जन्मावी इतका तरी वेळ द्या. एक अत्याचार विसरण्या, कळ त्याची शांत होण्या, जखमा पुसून पुण्यांदा... उभे राहण्यातरी वेळ द्या. वेदनेच्या या कवितेला पुरस्कार नकोच आहे. वेदना पुसावी कोणाचीतरी फक्त इतकाच आधार द्या. सृष्टी नित्य हसावी, आणि मानवता सुखे वसावी. सृष्टीला "संवेदना" हवी आहे, अरे,अस्तित्वाला तरी वेळ द्या. कविता असो वा वेदना! त्याने उपायांचा जन्म व्हावा. क्रांतीचा रक्तपात थोपावया अरे,थोडा तरी वेळ द्या. -डॉ मनोज पाटील