पर्यावरण दिन सार्थक होण्यासाठी..
5 जून, जागतिक पर्यावरण दिन! संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचे निश्चित केले. 1974 साली 5 जून या दिवशी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचे हे 47 वे वर्ष आहे. .... विचार करण्याची गोष्ट आहे..... एखादा दिवस साजरा करण्याचे आपण ठरवतो कारण,तो विषय जगातील सर्वांच्या चिंतनाचा विषय व्हावा. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्या विषयाचे गांभीर्य कळावे आणि ती समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी कृती करण्यास प्रवृत्त व्हावे. वस्तुस्थिती अशी आहे की सत्तेळीस वर्षांमध्ये प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालला आहे. तर काय करायला हवे?... 1. कारणांपेक्षा 'उपाय' याला अधिक महत्त्व द्यायला हव!पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची कारणे काय आहेत? याबरोबरच त्याचे उपाय काय आहेत? या दोन्हीवर विचार होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पेशंट, डॉक्टर कडे गेल्यानंतर आपल्याला काय होते आणि का होते हे सांगतो आणि डॉक्टर त्या सर्वांचा विचार करून,...