संयुक्त उपचार लेखांक ३
आमवात, संधिवात आणि संयुक्त उपचार -------------------------------------------------- र्हुमेटॉइड अर्थराइटिस अशा नावाने एक अत्यंत त्रासदायक आजार समाजामध्ये सर्वत्र दिसून येतो. भारतामध्ये त्याचा प्रसार सर्व राज्यांमध्ये पाहायला मिळतो. वयाच्या विशीपासून साठीपर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकतो. साठीनंतर हा आजार रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना ही खूपच त्रासदायक ठरतो. स्त्रियांच्यामध्ये पुरुषांच्यापेक्षा तुलनेने अधिक प्रमाणात दिसून येते. या आजारामध्ये रुग्णांचे सांधे दुखत असतात. काही प्रमाणात सूज सुद्धा आढळते. सकाळच्या वेळी, थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात ,आकाशामध्ये ढग आले तर वेदनेचे प्रमाण वाढते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार रक्तामध्ये र्हुमॅटीक फॅक्टर वाढणे हे याचे चिन्ह समजले जाते. रक्ताची सीबीसी नावाची चाचणी केली तर त्यामध्ये ई एस आर वाढलेला दिसून येतो. आयुर्वेदामध्ये प्राथमिक अवस्थेत याला "आमवात" असे म्हणतात आणि तो गंभीर झाला म्हणजे त्याला संधिवात असे म्हणतात. गंभीर स्थितीमध्ये सांधे वाकडे सुद्धा होतात. आयुर्वेदामध्ये या आजाराचे मूळ पचनसंस्थेचे विकार यामध्ये आ...