Posts

Showing posts from July, 2024

कृष्णामाई आणि तिची लेकरं!

(1) "हे कृष्णामाई,  तू सांगलीकरांच्यावर कोपू नको.. पुन्हा महापूर नको...पुन्हा महापूर नको!" अशा आर्त हाका आता ऐकू येऊ लागल्या आहेत....      स्वाभाविक आहे.. पाऊस चालू आहे...अजून पडणार असे दिसते आहे. पण हीच कृष्णामाई, आपल्याला जेव्हा आर्त हाका देत असते....       "माझ्या लेकरा! माझ्या काठावरची झाड तोडू नको...तोडली तर तोडली.... तर आता लावायला मागं सरू नको ." हीच कृष्णमाई हाक देत असते...       " माझ्या लेकरा, माझ्यामध्ये असं विषारी पाणी सोडू नको...ते विष तुझ्या जीवनामध्ये वापरायचं बंद कर... मग ते सॅनिटायझर असू दे, फर्टीलायझर असू दे जरा विचार करून वापर. जरा विचार करून वापर " हीच कृष्णामाई हाक देत असते...        " माझ्या लेकरा,प्लास्टिक सगळीकडे पसरू नको. ते रिसायकलिंगला दे...जोपर्यंत सायकलिंगला देऊ शकत नाही तोपर्यंत साठवायची काहीतरी युक्ती करून ठेव." हीच कृष्णामाई हाक देत असते...       "सतत माझ्या काठावरची, गावामधली, शहरांमधली माळावरची तळी,ओढे,नाले अडवून, तुडवून नष्ट करू नको... ते साठवे तसेच राहू देत रे!... तेच...