पुरस्काराच्या निमित्ताने...
पुरस्काराच्या निमित्ताने... --------------------------------- पुरस्कार मिळाल्याचे समजले तर सर्वजण अभिनंदन करतात.पण पुरस्कार दिल्याचा हेतू जर साध्य व्हायचा असेल तर दोन गोष्टी घडायला हव्यात असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे ज्यानी पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली त्याबद्दल त्यांचं कौतुक व्हायला हवं. ज्याला पुरस्कार मिळाला आणि ज्या कारणासाठी पुरस्कार मिळाला योग्य कामाचा अधिक विस्तार व्हायला हवा. पुरस्कार देण्याचे अनेक उद्देश असू शकतात. चांगल्या गुणांचा गौरव व्हावा हा त्यातला पहिला आणि सार्थ उद्देश असावा. समाजामध्ये चांगलं कार्य करत असणाऱ्या लोकांच्या मध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण होतं. तसं होत असेल तर ते हव आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुरस्कार मिळाला तर ते पुरस्कारयोग्य काम अधिक प्रतिष्ठा पावते, ते काम करण्यासाठी त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली प्रेरणा ही एक महत्वाची गोष्ट असते. प्रेरणा जिवंत राहावी यासाठी असणारी परिस्थितीसुद्धा कारणीभूत असते. परस्थिती समाजामध्ये असलेली एखादी समस्या असू शकते. पण "समस्या" सदैव राहावी...