covid-19 नंतर आपली जीवनशैली कशी असावी?
covid-19 नंतर आपली जीवनशैली कशी असावी? ------------------------------------------------------------------ ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदललं, रशियाच्या पतनानंतर आणि शीत महायुद्धानंतर जग बदललं, 2008 च्या जागतिक मंदी नंतर जग बदललं ,त्याप्रमाणे 2019 च्या कोरोना महामारी नंतर जगात फार मोठे बदल होण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे. हे बदल सर्वच्या सर्व देशांची आर्थिक नियोजन आणि आंतरराष्ट्रीय संबंध अशा स्थूल स्वरूपाच्या ज्या बाबी आहेत ( macroeconomics) त्यावर तर परिणाम करणार आहेतच! परंतु प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे आर्थिक नियोजन, त्याच्या खर्चाच्या प्राथमिकता, त्याचे आरोग्य आणि माणसामाणसांमधील संबंध इथपर्यंत म्हणजेच सूक्ष्म पातळीवर (microeconomics)याचा परिणाम होणार असे दिसते आहे. स्वाभाविकपणे बदलाचा काळ ( transition phase ) त्रासदायकच असतो. कोणताही त्रास झाला तर ,प्राणी तीन प्रकारे प्रतिक्रिया देत असतात . घाबरून थिजून जाणे, पळून जाणे ...