संयुक्त उपचार आणि पोस्ट कोविड

कोविडचे उपचार संयुक्त उपचार पद्धतीने करत असताना आणि केल्यानंतर चार गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.
ऍलोपॅथी उपचारा बरोबर आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी याचा वापर केला असता... कोविडच्या उपचारांमध्ये सोपेपणा आला, रोगाचा त्रास कमी झाला ,उपचाराचा खर्च कमी झाला आणि पोस्ट कोविड त्रास जवळ-जवळ झालेच नाहीत.

सुरेश पाटील, वय 55 वर्षे (नाव बदलले आहे) यांना कोविड झाला असे समजले त्या दिवशी रविवार होता. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये कुटुंबियांचा फोन आला. ''घाबरू नका, स्वच्छ मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश याचे सेवन करा. युट्युब वर 'सूक्ष्मयोग' आहे त्याच्या लिंक पाठवतो त्यानुसार व्यायाम करा. आवश्यकता पडली तर लक्षणाप्रमाणे एखादे औषध घ्या उद्या सकाळी आपण पाहूया." असे त्यांना सांगितले. तथापि नातेवाईकांच्या दबावामुळे रुग्णालयांमध्ये जाऊन ऍडमिट झाले. पाच दिवसांच्या उपचारानंतर जेव्हा परत आले तेव्हा छातीची तपासणी केल्यावर असे लक्षात आले की छातीमध्ये क्रेपिटेशन जसेच्या तसे आहेत. फक्त ताप थांबला आहे आणि मनातून भीती नष्ट झाली आहे. चेहऱ्यावर सूज होती. थोडी धाप लागत होती. त्यांना ऍलोपॅथीची औषधे बंद करावयाची होती. श्वासहर काढा आणि आरोग्यवर्धिनीचा योग त्यांना देण्यात आला.

सात दिवसांनी परत येण्यास सांगितले होते .पण ते तीन दिवसांनी परत आले. त्यांना स्वतःला अत्यंत फ्रेश वाटत होते. छाती तपासली तर क्रिपिटेशन गायब झाले होते. वैद्य आणि रुग्ण हे दोघेही आत्मविश्वासाने ओतप्रोत होते...इथे अभिप्राय असा नाही की ऍलोपॅथीच्या उपचारापेक्षा आयुर्वेदाचा उपचार श्रेष्ठ आहे. असेल अथवा नसेल! पण संयुक्त उपचारांमुळे अचिंत्य अशा स्वरूपाचा फायदा होतो हे निश्चित!

सूक्ष्म योग, प्राणायाम ,नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये एका बाजूला पचन संस्था आणि श्वसन संस्थेला अधिक कार्यक्षम करण्याचे उपाय आहेत, तर दुसर्‍या बाजूला लिव्हर आणि किडनी यांचे काम व्यवस्थित होऊन शरीरामध्ये असलेले टॉक्सिनस् बाहेर काढून शरीर शुद्ध करीत राहणे हे साधले जाते. जेव्हा टॉक्सिनस् बाहेर पडतात असे आपण म्हणतो, तेव्हा स्वाभाविकपणे शरीरामध्ये नंतर घडून येणाऱ्या गोष्टी टळतील हे गृहीतच आहे.

 'नॅचरोपॅथी'असे म्हणत असताना स्वच्छ मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश यांचा आग्रह धरला जातो. स्वच्छ मोकळ्या हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण चांगले ठेवणे सहजपणे घडून येते. हे कोविडच्या उपचारांमध्ये अपेक्षित असलेलेच काम आहे. कोवळ्या सूर्यप्रकाशातून विटामिन डी तयार होण्यास मदत होते. विटामिन 'सी ' आणि ' डी '  चे योगदान कोविडच्या उपचारांमध्ये आहे, हे जगाने मान्य केलेलेच आहे. 

आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये श्वसनाची क्रिया स्पष्ट करताना ''हृद्कमलांतरम्...'' चा सुप्रसिद्ध श्लोक आहे. त्यामध्ये हृदयाचे आरोग्य , फुपुसाचे आरोग्य आणि अस्थिधातूचे आरोग्य यांचा संबंध अतिशय चांगल्या प्रमाणे वर्णन करून सांगितला आहे . तीनही गोष्टींचा एकत्रित विचार करण्याची सदैव आवश्यकता आहे. हे दीर्घकाळ प्रॅक्टिस केलेल्या सर्वच डॉक्टरांना लक्षात येणारी गोष्ट आहे.

कोविडचा उपचार जेव्हा आयुर्वेदाने केला जातो तेव्हा खालील पाच गोष्टींचा विचार होतो.
कफच्छेदन,
रसरक्तपोषण,
प्रतिकारशक्ती विकास,
अग्नीदिपन,
हृदयाला बल देणे.

या पाच गोष्टींने जेव्हा कोणी उपचार करतात तेंव्हा पोस्ट कोविड प्रॉब्लेम्स समोर येण्याची शक्यताच नष्ट होते . पोस्ट कोविड प्रॉब्लेम्स समोर येतच नाहीत. अगदी काही थोड्याप्रमाणात अशी लक्षणे दिसून आल्यास चार - आठ दिवसासाठी तीच औषधे पुढे चालू ठेवल्याने लाभ होऊनच जातो.
या पाच गोष्टी अशा आहेत, ज्या मुळे हृदय आणि रक्तवाहिन्या यांचे आरोग्य चांगले ठेवले जाते. अन्ननलिका आणि मोठे आतडे यांचे कार्य व्यवस्थित राहते. त्यामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित व्याधी उद्भवण्याचा धोका स्वाभाविकपणे कमी होतो. योग आणि प्राणायाम याच्या मुळे सुद्धा शरीराची पोकळी असणारे सर्व अवयव स्वच्छ राहण्याची प्रक्रिया होते आणि त्याचाच फायदा पोस्ट कोविड तक्रारींना रोखण्यासाठी होतो.रुग्णाला लवकर बरे वाटू लागते.

रुग्णालयात भीतीदायक वातावरणात रहावे लागत नाही. त्याला जेव्हा आश्वासक असे वातावरण घरातच प्राप्त होते, घरातील प्रिय व्यक्ती यांच्या सहवासामध्ये राहूनच त्याला त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविल्या जातात, सर्वांसाठी सांगितलेले असे प्रोटोकॉल्स अथवा गाईडलाईन्स  ज्याचा त्याला खरोखरच उपयोग असेल तरच त्याचा अंमलबजावणी केली जाते, आवश्यकता नसेल तर का प्रोटोकॉलला फाटा देऊन त्याला व्यक्तिगत दृष्ट्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता केली जाते, त्यावेळी त्याची मानसिक अवस्था सुद्धा सकारात्मक राहते. हा सुद्धा चिकित्सेचा एक उपयुक्त भाग आहे हे कुणी ही नाकारू शकणार नाही.

या सर्व कारणांमुळे संयुक्त उपचार पद्धती चा उपयोग कोविडच्या रुग्णाना लवकर आराम देऊ शकतो, सहजपणे आराम मिळू शकतो, कमी खर्चात आणि घरी राहूनच उपचार करता येऊ शकतो, आणि को बीड नंतरचा आजारांना अटकाव करता येऊ शकतो, हे दिसून येते.
या उपचाराच्या दरम्यान आणि रुग्णाच्या नातेवाईकांना जी अनुभूती येते त्यावरून या काळात त्यांना सांगितलेल्या सूचना आणि तत्वांचा वापर करून आपले उर्वरित आयुष्य सुद्धा तुलनेने अधिक निरामय करू शकतात.

-------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)