Posts

Showing posts from May, 2021

कोरोनाचे पाच टप्प्यांमध्ये वर्गीकरण

कोरोनाचा पाच टप्प्यांमध्ये मुकाबला --------------------------------------------------        एक काळ असा होता जेव्हा एक कोरोनाबधित रुग्ण सापडला तर एक किलोमीटर त्रिज्येचा प्रदेश पूर्ण बंद केला जायचा. रूग्ण जेथे गेला असेल त्या हॉस्पिटलला सुद्धा बंद केले जायचे. आता केवळ रुग्णाच्या घराला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. आजाराचे स्वरुप जसजसे कळत गेले तसतसे उपायाचे मार्ग सोपे सोपे होत गेले. भीतीचे सावट कमी होऊन उपचारात सुलभता येऊ लागली आहे.        आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि पावलापावलावर आपल्याला मदत करणारे समाजातील सर्व आदरणीय जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स ज्यांना आपण आपले फॅमिली डॉक्टर म्हणतो, ते सुद्धा आता टेबलवर पेशंटला घेऊन पाहू लागले आहेत. परस्परांची चर्चा आणि माहितीच्या आधारावर उपचाराचा एक क्रम आणि एक पद्धती आपोआप तयार होऊ लागली आहे. प्रशासन आणि सीनियर डॉक्टरांची मदत होत आहे. सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांना अनुकुलता प्राप्त होण्यासाठी पुढे येत आहेत.        कोरोणाच्या संकटाला परास्त करण्यासाठी त्याचे व्यवस्था...