Posts

Showing posts from June, 2021

ईकोब्रिक्स

इको ब्रिक्स अभियान...संकल्प... उद्घाटन! ------------------------------------------------------ (हिंदी भाषांतर के साथ)        एक कार्यकर्ता मित्राच्या घरी जातो. दरवाजाची बेल  वाजवितो. जोपर्यंत आतून दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत दरवाजाच्या बाजूला असलेल्या डक्ट मध्ये कार्यकर्त्याचे लक्ष जाते.. ..एक मोकळी पाण्याची बाटली आणि थोडे प्लास्टिक तिथे पडलेले असते.... कार्यकर्ता डक्ट मध्ये उडी मारतो.... तिथे जमलेले प्लास्टिक, बाटली मध्ये भरतो.... तोपर्यंत दरवाजा उघडतो.        दरवाजा उघडणारा मित्र , त्याच्यावर एक स्मितहास्य फेकतो .प्रतिउत्तर म्हणून कार्यकर्ता ही मनापासून  हसतो.         मित्राबरोबर बोलणे झाल्यावर  प्लास्टिक ने अर्धी भरलेली बाटली मित्राला भेट करतो.       " आता उरलेले काम मी पूर्ण करतो ",तो मित्र संकल्प करतो.         मित्राची पत्नी म्हणते ,"हो हो ...आम्ही पूर्ण करतो".                            ...

Matter of health after 45

माननीय आयुक्त यांच्या घरी काल रात्री झालेल्या भेटी संबंधी व्हाट्सअप संदेशाचे लेखन आणि संप्रेषण माननीय सयाजी शिंदे आदींच्या कडे सकाळी उठल्याबरोबर झाले. जाग आल्यापासून सर्वांगामध्ये व्यायामाची खुमखुमी होती बाहेर पाहतो तर पाऊस पडत होता. आताशी खुमखुमी दबून जाणार की काय अशी भीती वाटू लागली. चिरंजीव पारस समोर तसे बोलून दाखवले तर त्याने चॅलेंज केले, “ मग पावसात जायचे!” वा,छानच संधी होतीथोडसा थोडे वॉकिंग .. भरपूर जॉगिंग... त्यानंतर थोडे वार्मिंग अप् ...फास्ट रनिंग.. शेवटी कूलिंग डाऊन आणि स्ट्रेचिंग सारे सारे झाले. तीर्थरूप आईच्या सांगण्यावरून नवीनच तयार केलेल्या व्यवस्थेमध्ये मातीची पूर्तता केली आणि दोडका,कारली आणि दुधी भोपळ्याच्या बिया टोकल्या. आंघोळीला गरम पाणी दिले होते पण तरीसुद्धा गार पाण्यानेच मनसोक्त आंघोळ केली. अजूनही उनाडकी कमी झाली नव्हती .शिरगावला शेतावरती शेंगा च्या बिया घेऊन जाण्यासाठी तयार होतो. बाबांना आश्चर्य वाटत होते पण सौभाग्यवती ला राग येत होता सगळ्याच गोष्टी चे मन मजा घेत होते... अशी सगळी उनाडकी ची सकाळ ! यानिमित्ताने थोडस गंभीर परंतु अत्यंत महत्त्वाचा विषय... संसाराचा आणि...