प्रिंट मीडिया ते सोशल मीडिया-एक आव्हानात्मक प्रवास!
प्रिंट मीडिया ते सोशल मीडिया-एक आव्हानात्मक प्रवास! प्रस्तावना पाच-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..." ज्ञान म्हणजे पुस्तके, अभिव्यक्ती म्हणजे पेन!" अशी प्रतीके प्रचलित होती. हा पेन -कागदाचा संबंध म्हणजे प्रिंट मीडिया! आता पेन कागद नसताना सुद्धा अभिव्यक्ती आहे, माहितीचे संकलन आहे, माहितीचे विश्लेषण आहे, माहितीचे प्रसारण आहे... हे सर्व काही आता ज्ञानाचे साधन बनले आहे. "ज्ञानाचे साधन" असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे गृहीत आहे की माहिती म्हणजे ज्ञान नव्हे! तरीसुद्धा पुस्तकाला माहितीचे साधन कधीही म्हटले नाही त्याला ज्ञानाचे साधन म्हटले. म्हणून पुस्तक हे आजही आदराचे स्थान आहे निदान आमच्या मध्यम वयाच्या पिढीसाठी तरी! आमच्या आधीच्या पिढीसाठी तर पुस्तक हे निर्विवाद पूजनीय वस्तू आहे. आमची पिढी अशा परिस्थितीमध्ये आहे कोणते पुस्तक पूजनीय आहे आणि कोणते पुस्तक प्रचार साहित्य आहे कोणते पुस्तक एकांगी आहे आणि कोणते पुस्तक सर्वकालिक आहे हे आता तपासून पाहू लागलो आहोत. वैशिष्ट्ये आणि विचार :- सोशल मीडिया म...