Posts

Showing posts from December, 2020

तत्त्व चिंतन १

" काय उपयोग आहे??? काय उपयोग आहे सगळं चांगलं करून??? कुणाला किंमत आहे त्याची???... वापरून घेतात सगळे वापरून घेतात सगळे.... वापरून घेतात!'' अत्यंत रागारागाने आणि तावातावाने   अभिलाष बोलत होता. त्याच्या वाक्यावरून आणि त्याचा अविर्भाव आवरून सगळा इतिहास लक्षात येत होता. काय घडले असेल??? आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग येतात. सज्जन सदाचारी लोकांना तर खूप वेळा अनुभवावे लागते.  कॉल पण असे घडल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय असते बरे???   भालचंद्र काकांच्या अस्तित्वानेच ते जिथे  असतील, येथील वातावरण शांत आणि प्रसन्न होत असते. काकांच्या जवळ आला  तसा  अभिलाष सुद्धा थोडा  शांत झाला... मग काका त्याला सांगू लागले, " हे बघ अभिलाष,  असे प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. आपण खूप मन लावून काम करतो.  आपण खूप चांगल्या भावनेने काम करतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. परंतु  आपल्या अपेक्षाप्रमाणे आपलं कौतुक होत नाही. तेव्हा विचार करण्यासारख्या तुला पाठवतो तेव्हाच करा दोन गोष्टी आहेत. पहिला विचार हा आपण जे काम करतो ते कुणा व्यक्तीसाठी अथवा...