Posts

Showing posts from August, 2020

राष्ट्रीय सणानिमित्त...

भारत माता की जय!  राजकीय नेत्यांचे " अंध समर्थक " आणि  "अंधविरोधक" , "अंधभक्त " आणि " गुलाम'' असे काही शब्द रूढ झाले आहेत. हे शब्द टीका करण्यासाठी वापरले असले तरीही यात काही प्रमाणात वास्तव आहेच.   प्रत्येकाने आपले आपले आत्मपरीक्षण करून ठरवावे हे जास्त चांगले.   अशा प्रवृत्तीचे अस्तित्व देशाच्या प्रगती मधला एक अडथळा  बनू शकतो.   वस्तुतः  हे सर्वजण देशावर प्रेम करणारे आहेत.  "प्रेम करतात तरीही त्रासदायक ठरतात " हे काही बरे नाही !  15 ऑगस्ट 2020 .  लाल किल्ल्यावरून " आपला नेता " किंवा " त्यांचा नेता" बोलतोय असे कधीही समजू नये.  देशाचे प्रधानमंत्री बोलतायत,  ते कधी ही विसरू नये.   अमर्याद माहितीचे स्त्रोत  गहन अध्ययन  आणि चतुर आकलन  याचा सार असते ते भाषण!  त्यामध्ये प्राप्त केलेल्या उपलब्धीचं प्रदर्शन असतं.  कोणत्या पक्षाचे सरकार आहे,  त्या पक्ष्यांचं नसते ते यश...   ते भारत सरकारचे यश असतं.  ते भारतीय जनतेच  यश असत. ( त्यात काही अपयश असेल तर तेही आपलंच असत...

अवखळ श्रावण

अवखळ श्रावण --------------------- श्रावण महिना  अवखळ भारी  सकाळच्या पारी  चमचम सारी. दुपार असो वा संध्याकाळी.. सूर्या मधली  दाहकता गाळून अवघ्या सृष्टीला  झळाळी येई  . आधीच धुतलेली ओली ती सृष्टी भुरळ पाडी मनाला भारी. मंद किरणांचे मधुर आवतन  आपसूक मन मोहून जाई.    सोडूनी घरदार पडे मी बाहेर.  हिरव्या पदराच्या,  सोनेरी बाहूंच्या,  धुंद वाऱ्याच्या,  कुंद  कोंदणी,  खोल स्वतःला बुडवून घेई  . तोडून सारे बंध,  सोडून सारे दंभ,  निघालो एकाकी होऊन मुक्त. श्रावण सौंदर्याचा समर्पित भक्त. असा मी  विरक्त तसा मी  असक्त  अनोख्या मोहाला साफ फसुन् राही  . फसलेला भोळा हसलेली सृष्टी अचानक होते मेघांची वृष्टी. तसे पावसाळे कितीक  पाहिले... तरीही फसते मन?  हसते का चिडते,  कसे वर्तते मन?  रडते का शिकते,  काय करते मन?  हा तर अवखळ प्रेमळ श्रावण गोड शिक्षा अन..  मोठे शिक्षण! गोड शिक्षा अन..  मोठे शिक्षण देऊन जाई! ***** असंख्य येती आपुल्या जीवनी कितीक मधुर आमंत्रणे... ...

कोरोनाकडे आता नव्या दृष्टीने पाहायला हवे

कोरोनाकडे आता नव्या दृष्टीने पाहायला हवे ------------------------------------------         कोरोना आता "कम्युनिटी स्प्रेड" या स्थिति  मध्ये आला आहे. गेला 4 महिन्याच्या अनुभवावरून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत....         पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्याचा संसर्ग होण्यास संबंधीचे व्हिडिओ प्रसारीत झाले होते तितक्या भयानक पद्धतीने त्याचा प्रसार होत नाही.  केवळ कॉन्टॅक्ट म्हणजे व्यक्तीने हात लावलेल्या वस्तुस आपला स्पर्श होणे इतक्या सहजपणे त्याचा  संसर्ग होत नाही."कंटीन्यूअस क्लोज कॉन्टॅक्ट" ही त्याहून वेगळी गोष्ट आहे. काही मिनिटे  सलग,खूप जवळ, खूप वेळा आणि खूप लोकांशी संपर्क येणे याला कंटीन्यूअस क्लोज कॉन्टॅक्ट असे म्हणता येईल. आपल्या जीवनातले सर्व व्यवहार या गोष्टी टाळून करणे शक्य आहे. जे लोक घरातून बाहेर जातात त्यांनी परत आल्यानंतर विशिष्ट नियमांचे पालन केले तर  घरातील अन्य लोकांना बाधा होण्याची शक्यताही कमी होते. उदाहरणार्थ बाहेरचे कपडे घराबाहेरच ठेवणे. घरामध्ये प्रवेश करताना स्वच्छ हात पाय धुऊन घरी...

5ऑगस्ट

5 ऑगस्ट  ------------ आज  मर्यादापुरुषोत्तम श्री राम के मंदिर का अयोध्या में शिलान्यास हो रहा है l श्रीराम की कथा से उनके  आदर्शों का हमें ज्ञान हो जाता है l उन आदर्शों का पालन अगर हम अपने  व्यक्तिगत जीवन में करते हैं, तो शांति का अनुभव  कर सकते हैं l अपने कर्तव्यों का निर्वहन अधिक सहज और सुचारू रूप से कर सकते है l इससे एक खुशहाल दुनिया बन सकती है l  एक राजा  और योद्धा के रूप में भी  उनके आदर्श आज भी प्रासंगिक हैं l श्री राम के संबंध में जितना भी साहित्य उपलब्ध हैं उनसे यह उजागर होता है l एक विशेषता यह भी है कि भारत के सभी संप्रदायों में,  प्रदेशों में,  भाषाओं में श्री राम के संबंध में साहित्य उपलब्ध है l  भारत के बाहर भी कई देशों में श्री राम के संबंध में संदर्भ मिलते हैं l इसलिए  यह संपूर्ण दुनिया के लिए आवश्यक और महत्वपूर्ण है l हमें जिनका स्मरण करना चाहिए उनका कोई स्मारक हो इसमें क्या गलत है?जिस संस्कृति का ताना-बाना इन्ही आदर्शों पर बना हुआ है l  तो इस संस्कृति का प्रतिनिधित्व करने वाले देश के अंदर यह स्मारक हो ...