Posts

Showing posts from March, 2023

चला जीवनावर प्रेम करूया

मी सुंदर मी हुशार मी चतुर माझे बरोबर माझे छान माझे योग्य माझे महान कशा कशावर प्रेम करतो आपण चला जीवनावर प्रेम करूया.0 कशाला फुशारकी छोट्या छोट्या यशांवर, आपण काही काळ चमकलो त्या थोड्या थोड्या क्षणांवर? जीवनातल्या अनेकविध अनुभवांवर, अडचणींवर आणि संकटांवर, त्यातून प्राप्त होणाऱ्या आनंदावर आणि शहाणपणावर प्रेम करूया . तशी संधी मिळाल्याबद्दल जरा कृतज्ञ राहूया. चला जीवनावर प्रेम करूया.1 मी काय वाचलो, मी काय शिकलो, मला किती माहिती आहे त्याची फुशारकी कशाला? माहिती किती आगाध आहे ज्ञान किती अनंत आहे  एक सागर आहे डुंबायला  त्याच्या भव्यतेवर प्रेम करूया  आपण जे जाणतो त्यातून आनंद किती निर्मिला ते पाहूया. चला जीवनावर प्रेम करूया.2 मी मी, माझे माझे क्षणभंगूर सारे आज असेल उद्या नसेल त्याची फुशारकी कशाला? सत्य किती सुंदर तत्त्व कोणते शाश्वत आहे मी,माझ्यातला कोणता अंश क्षणभंगुर  आणि कोणता अंश शाश्वत आहे सत्य सुंदर शाश्वतावर मनापासून प्रेम करूया त्याचाच शोध घेऊया, त्यातच स्वतःला शोधूया चला जीवनावर प्रेम करूया.3 कुणा कुणामध्ये किती किती दोष कोणी किती त्रास दिला याची सदा उजळणी कशाला? कि...

पर्यावरण गीत २

अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे । जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे ।। झाडे लावून जमेल तेथे ,पक्षी प्राणी जगवायाचे । शून्य कचरा-शुद्ध निचरा,वीज जपून वापरायाचे।। अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे । जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे।। आधी 'नको' म्हणायचे पॉलिथिनला , जर आले घरी तर पुन्हा वापरायचे । इकोsब्रिक्स बनवायचे पण, कचऱ्यामध्ये नाही मिसळायचे।। अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे। जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे।। एक... तीन... दहा चे प्रमाण, "बायोएन्झाइम" घरी बनवायचे । बीजांपासून रोप बनावे,हे काम गोड कौतुकाचे ।। अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे । जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे ।। अरे मनात-घरात तेच तेच ,शाळेत-देवळात तेच तेच। अरे ,गाव-गल्ली, शहर-जिल्हे,या देशाचे नाव उजळायचे ।। अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे । जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे ।।