जेन झी
*जेन झी* ------------- अडकू नको "अभिमन्यू", पुन्हा चक्रव्यूहामध्ये हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे! निर्माणाच्या आकांक्षा आहेत तुझ्याकडून विध्वंसाच्या हाकेला बोल तू "नाही रे " दवबिंदूसारखं काही क्षणात तुझं लक्ष उडून जातं, त्याच दवबिंदूमध्ये नयनरम्य प्रतिमाची आस आहे तुझ्याकडून. स्पंज्यासारखं शोषून घेतोस सहज तू तंत्रज्ञान तोच ओलावा घेऊन नापीक झालेल्या जमिनीला सुपीक बनवण्याची अपेक्षा आहे तुझ्याकडून. ध्रुवासारखा हट्ट कर, पण यावेळी थोडा बदल कर, भारतमातेसाठी अढळपद माग... स्वतःसाठी नाही रे! अभिमन्यूसारखा अडकू नको पुन्हा चक्रव्यूहामध्ये, हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे! निर्माणाच्या आकांक्षा आहेत तुझ्याकडून,विध्वंसाच्या हाकेला बोल तू "नाही रे " कमलपत्रासारखा पाण्यात ही वेगळा राहतोस तू. तरीसुद्धा कल्पनेच्या गावांमध्ये निवांत रमतोस तू. शिवरायांसारखा यवनांपासून धरतीचं दुरित दूर करण्याची शपथ कधी करशील तू? विवेकानंदासारखा शाश्वताची ओढ घेऊन रामकृष्णाच्या शोधार्थ कधी निघशील तू? पाण्यासारखा निर्मळ तू, झर्यासारखा खळखळ तू, धबधब्यासारखा नृत्यरम्य प्रवास तू... शेतामधल्य...