Posts

Showing posts from January, 2022

सायकल यात्रा(भाग - ३)

सायकल यात्रा (सायकलींग करत असताना... भाग - ३) --------------------------------------- सायकल यात्रेच्या दरम्यान बाहेरच्या परिसराशी आपला जो संबंध येत होता, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने कौतुकाचे आणि कुतुहलाचे दर्शन होत होते. अनुभवाने संपन्न होणाऱ्या जीवनाला आणखी काही स्तर असतात. शारीरिक स्तर, मानसिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर! शारीरिक स्तरावरती पहिल्या दिवशी तर मानसिक स्तराने मात केलेली दिसून आली. प्रवासाचा पहिला दिवस असल्यामुळे काय काय घडू शकते यासंबंधी खूप ऐकायला मिळाले होते ,त्याची धास्ती होती. यापूर्वी अशा प्रकारचे काम अनेक जणांनी केलेले पाहिले असल्यामुळे , 'आपल्यालाही जमेल ' अशी एक शाश्वती सुद्धा होती.  आमच्या संयोजकांनी ज्या चार महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यामध्ये पहिली सुचना होती...रस्त्याच्या डाव्या बाजूने सिंगल लाईन ने जायचे. रस्त्यावरून गप्पा मारत सायकल चालवणे योग्य नाही. दुसरी सूचना होती आपल्या सायकली हलक्या आहेत त्याला गती अधिक असते आणि एकमेकांच्या संगतीने ती अधिक वाढते. त्यामुळे नजर समोर असावी. इकडे तिकडे पाहायला गेले की नकळत हँडल सुद्धा वळते. मग स्वाभाविकपणे सायकल ही कु...

सायकल यात्रा भाग २

सायकलिंग करत असताना एका बाजूला विकासाच्या महामार्गाचा अनुभव घेत होतो. राष्ट्रीय महामार्गावरून सहज सुगम सायकलींग करता करता मोबाईलच्या माध्यमाने आपल्या सहकार्‍यांशी आणि कुटुंबांशी संपर्क ठेवणे अत्यंत सोपे झाले होते. एवढेच काय कोठे थांबायचे आहे? नाश्त्याची सोय कोठे आहे ?जेवणाची सोय कोठे आहे? अजून किती अंतर राहिले आहे? कोणत्या मार्गाने जायचे आहे ?हे सगळे मोबाईल सांगत होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला झाडे ,शेती, माणसे आणि गांवे होती. त्यांच्याशीही एक "संवाद" होत होता. लोकांच्या नजरांत कौतुक होते. कुतूहल होते.चौकशी करीत होते. मदत करीत होते.  "आम्ही प्रवासी म्हणजे जणूकाही संन्याशी!",असा व्यवहार करत होते. चहा प्यालो तर," चहाचे पैसे नको " म्हणणारी एक भगिनी... पराठा खाल्ला तर," त्याचे नका देऊ पैसे" असे म्हणणारा भाऊ... मार्ग विचारला तर "पुढच्या कोपऱ्यापर्यंत जाणारे सोडून ये त्यांना "असे म्हणणारे कोणीतरी... मंदिरात गेलो तर ,"तुम्ही देवाचेच काम करीत आहात देव तुमच्या कामात मदत करील "असे म्हणणारे पुजारी... आमची राहण्याची व्यवस्था ,आमची खाण्याच...

सायकल यात्रा भाग१

दिवस आभार मानायचा! ............................... पहिली सुरुवात माझ्या आई-वडिलांपासून ,ज्यांनी अशा सात्विक आनंदासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्याची प्राथमिकता येईल असे संस्कार दिले. इथे येताना परवानगी आणि आशीर्वाद दिले. पत्नी व मुलांचा माझा परिवार... ज्यांच्यावर पडणार होता माझ्या जाण्याने अधिकचा भार ... तरी सुद्धा केवळ माझ्या आनंदासाठी सोसायचे ठरवले त्यांनी! मग माझा मित्र परिवार ! ते आहेत म्हणून मी आहे. " तुम्ही बिनधास्त जावा,आम्ही आहोत इथे काही कमी जास्त लागली तर"... तसे नसते तर निर्णय होऊ शकला नसता सायकल यात्रेला येण्याचा! आता आभार संयोजकांचे!  परमपूज्य गुरुवर्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विचाराच्या प्रसारासाठी आणि त्यांच्या कार्याच्या परिपूर्णतेसाठी वाटचाल करत असताना सुद्धा, संयमाचे पालन करणाऱ्या आशा ज्यांनी अशी योजना आखली, अमलात आणले, त्यासाठी लागणारे कष्ट उपसले, कष्ट किती झाले ते मी माझ्या डोळ्याने पाहिले. आम्ही मात्र केवळ लाभ घेणारे! लाभ देणार्‍यांचे मनापासून आभार!! प्रवासामध्ये आमच्या भोजनाची व्यवस्था करणारे आचारी, हाताने बनवून भाकरी करू...

आली ..आली...कोरोना ची तिसरी लाट!

कोरोना ची तिसरी लाट ----------------------------- तिसरी लाट येणार की येणार नाही ? याचा विचार करत असताना तिने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. छोट्या शहरांमध्ये आणि छोट्या दवाखान्यांमध्ये रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. मागील दोन लाटांचा अनुभव पाठीशी असलेल्या प्रशासनाला यासंबंधी तयारी करायला निश्चितच सोपे जाणार आहे. रुग्ण आणि वैद्यकीय व्यवस्थेला सुद्धा मागील अनुभवांचा फायदा होणारच आहे. परंतु या लाटेची काही वेगळे वैशिष्ट्ये असणार आहेत. या वैशिष्ट्यांचा सुद्धा विचार व्हायला हवा. रुग्ण आणि एकूणच समाज अधिक भयग्रस्त होणार नाही, परंतु जागरुक राहील ....यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.  रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होणार नाही . तसेच वैद्यकीय व्यवस्थेला मुक्तपणे व परिणामकारकपणे काम करण्याची सुविधा प्राप्त होईल ,याचाही विचार व्हायला हवा.        सरकारी यंत्रणा आणि खाजगी डॉक्टर्सनी मागील दोन लाटांमध्ये शेवटच्या टप्प्यात चांगल्या प्रकारे समन्वय साधल्याचे दिसून आले आहे. आत्तासुद्धा अशा समन्वयाची अत्यंत गरज आहे .तशी रचना केली ना...

आरावली

आरावली ------------ सोने की मिट्टी फूल जैसे पहाड़ लोगों की बातें और दिल गुड का शरबत!! छोटी छोटी टेंकडीया जैसे गुलाब की पंखुड़ियां, खो जाये मुसाफिर ऐसी पेड़ों  की अंगड़ाइयां। मुसाफिर मन फस रहा था बरबस मोह के जाल में , हवायें रोक रही थी मगर बुद्धी लगी थी निकलने में। निकलने की कोशिश में  मुसाफिर के पसीने छूट रहे थे, जैसे जैसे पिघलते रहे वैसे वैसे वे महक रहे थे। फूलों के साथ रहकर फूलों जैसे बनते गए। यह फूल,फुल नहीं  पहाड़ी है यह याद रहे। हल्दीघाटी का शेर घूमा होगा यहीं कहीं उसकी यादें, उसके हौसले जिंदा है अभी, मरे नहीं । जिंदा है अभी, मरे नहीं।। - डॉ मनोज पाटील २५/१२/२१