Posts

घर आणि घरघर

घर आणि घरघर घरातून जाताना "जाऊन येतो" म्हणावे,  'जाऊन इथेच परत येऊ' असेच वाटावे. घरामध्ये येतानाच जायचे नियोजन? मनात नक्की काहीतरी खदखदत असावे. खदखद कसली ती न सांगता कळावी  तरच तिथे आपलेपणा समजावा. अन्यथा नुसतीच माणसे, नुसतीच नाती असा लादलेला मेळावा नसावा.   आपला आपला अहंकार नि पूर्वग्रह,  वाळवीप्रमाणे 'पोखरतो' पूर्ण घराला.  अभिमानही संपूर्ण घराचा असावा  तोच बळ देतो घरातील प्रत्येकाला. चांगला जोडीदार,चांगली मुले  मिळाली म्हणून 'नशिब' समजावे. गृहीत त्यांना धरू नये,'जपावे,' ते घरी आल्यावर आनंदी दिसावे. स्वार्थ असेल तर परिवाराचा असावा, मोठा असावा पण संकुचित नसावा. 'व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाचे असते'असा सर्वांच्या चिंतानाचा विषय असावा. चांगुलपणा केला असेल तरी कधी शब्दातून व्यक्त न व्हावा कर्तेपणाचा भाव नसावा, न बदलता येणारा 'स्वभाव' समजावा  चांगला मुलगा, चांगली मुलगी  एवढेच असून कुठे भागते? चांगला संसार होण्यासाठी  वेगळे 'चांगले' असावे लागते. वैद्य मनोज पाटील दि. 10/03/2026

उ:शाप हवा आहे आम्हाला.

कविता 1 शब्दांचे बुडबुडे बुडबुडातल्या प्रतिमा प्रतिमांच सौंदर्य सौंदर्याचा विलास नाही भुलवत आम्हाला.. पाण्याची शुद्धता, शुद्धतेचा प्रवास प्रवासातून पोषण  पोषणातून होतं जे निर्माण त्याची आस आहे आम्हाला. शब्दांचे वावडे नाही... शब्दांच्या भावना  भावनेचा अर्थ, अर्थानुसार कृती  अपेक्षित आहे आम्हाला. वक्तृत्वामागे असावी तपस्या तपस्येचे तेज तेजाचा प्रकाश नि ऊर्जा, विनाशाच्या शापाला  उ:शाप हवा आहे आम्हाला.  मनोज पाटील  दिनांक28/ 2/26

कथा सामान्य पुरुषांची!(कविता )

कथा सामान्य पुरुषांची! ----------------------------- जे नोकरी करतात, ते मालकाच्या आज्ञेप्रमाणे काम करतात. त्यांचा तो 'जॉब' असतो,ते पूर्ण करतात.  आपण आपल्या घरातल्या सगळ्यांच्या इच्छा  स्वतःहून ओळखून त्याची पूर्तता करणारे  असे दैवी नोकर असतो. पण स्वतःला 'घराचा प्रमुख' म्हणवितो. बऱ्याचदा पत्नीसाठी आपण  एक हक्काची उपयोगाची वस्तू असतो. ती वस्तू तिच्या मनासारखी काम करत असेल तर  कदाचित तिला अभिमानसुद्धा असतो. ती आपल्याला इंधन आणि ऊर्जा पुरवते कधी कधी थोडीफार 'देखभाल' सुद्धा करते. आणि आपण मात्र भाबडेपणानं  तिला आपली 'प्रेयसी' समजतो. सदानकदा आपण आपल्या मुलांसाठी  'सुपरमॅन' बनण्याचा प्रयत्न करतो. पण खरं तर, आपणच सुरू केलेल्या  एसआयपीचा 'इंस्टॉलमेंट' भरत असतो. काही मोजक्या क्षणामध्ये  आपण एक रजिस्ट्रेशन फॉर्म वर 'सिग्नेचर' करतो,  आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट 'ऑटोडेबिट' होत असतो. कधीतरी विचार करतो,'स्वतःसाठी वेळ काढायचा!' तो 'स्व' कुठे आहे? हे शोधण्यामध्येच  उपलब्ध असलेल्या वेळ संपतो आणि समोर आलेल्या कामाला समर्पित होऊन ...

मराठी कविता : “कृतज्ञता”

Image
जीवनाची त्रेपन्न वर्षे सरली, मन आज स्वतःशीच बोलले, "किती क्षण स्वतःसाठी जगलो, किती जगासाठी विरघळले ?" जितके जगलो मी स्वतःसाठी, 'आरोग्य' त्याचा हिशोब सांगते; जितके वाहिलो इतरांसाठी, नजरेत त्यांच्या आब दाटते. कुणी आपुले क्षणक्षण देऊन वाटांना माझ्या प्रकाश दिधला, किती हातांनी स्वप्न पेरले, किती जीवांनी प्राण फुंकले . काही श्वास मजवर अर्पून गेले, काही माझ्यात सामावून गेले; मी यशाच्या दिशेने चालत राहिलो, ते मात्र सावलीसारखे विरून गेले. ज्यांच्याकडून घेतले खूप काही, देऊ शकलो नाही काहीही. त्या सर्वांची मागतो क्षमा पण  मम शब्दांचे सामर्थ्य नाही. आशीर्वादांचे ऋण अनंत  कसे फेडावे, कसा हिशेब? कृतज्ञतेच्या ओलाव्यानेच भरू पाहतो अंतरीचा मेघ. ज्यांनी चालायला शिकविले, ज्यांनी थांबून दिला विचार;  बदलालाही साथ दिली आणिक  काही करण्यास मोकळे आकाश आई-वडिलांचे मायेचे छत्र, गुरूंचा तेजस्वी ज्ञानदीप; आजोबा-आजींचे संस्कार, मित्रांचा विश्वास अतीव. ज्या हातांनी मला घडविले, ज्या नजरेने मला उचलले. आकाशाची अथांगता, मातीची शांत सहनशक्ती; ढगांचा करुण ओलावा, पावसाची जीवनशक्ती. झाडांची ...

मेरी कृतज्ञता

कविता का नाम:- मेरी कृतज्ञता (18 फेब्रुवारी 2026) जीवन के तिरपन वर्ष बीत गए, मन आज स्वयं से प्रश्न करे— कितना जिया मैं अपने खातिर, कितना जग के वश में धरे। जितना जिया अपने लिए, सेहत उसका लेखा दे; जितना जिया औरों के हेतु, उनकी आँखें स्नेह कहे। किस-किस ने अपने पल देकर मेरे पथ को 'राह' बनाई, कितनों ने सपनों को सींचा, कितनों ने कीमत चुकाई। कुछ जीवन मुझमें समाए, कुछ मुझ पर अर्पित हो गए; मैं चलता रहा सफलता की ओर, वे चुपचाप कहीं खो गए। जिनसे पाया, दे न सका कुछ उन सबसे मैं क्षमा वरूँ; लेकर ऋण अनगिन आशीषों का कैसे उसका हिसाब भरूँ? जिसने चलना सिखलाया, जिसने रोककर सोच दिया; जिसने परिवर्तन में साथ दिया, कुछ करने का अवसर दिया। मातपिता की ममता से लेकर गुरुओं का वह ज्ञान प्रकाश; नाना-नानी, दादी-दादा, मित्रों का अनुपम विश्वास। जिन हाथों ने जीवन तराशा, जिन आँखों ने मुझे संवारा उन सबका मैं ऋणी सदा हूँ, उनसे ही मेरा जग सारा। आकाश, मिट्टी, बादल, वर्षा, पेड़, नदी, वन-फूल सुहाने; पशु-पक्षी, कीट और जीवाणु सब जीवन के सच्चे ठिकाने। वे कुछ भी माँगेंगे नहीं... फिर भी मन 'अर्पण' चाहता; स्मृतियों मे...

अंतर

तसा आपला समाज खूप छान आहे त्यासोबतच आनंदाला खरं उधाण आहे प्रकृती किती संपन्न आणि सुंदर सुखशांतीयुक्त जीवनाचे एक मंदिर आहे सगळ्यांचाच मिळून हा समाज आहे आपण सगळे समाजाचे अंतरंग आहे आपल्या अंतरंगात समाज आणि प्रकृतीच्या अंतरंगात आपण आहे. प्रकृतीची किती रूपे अनंत नी आगाध आपल्या अंतरंगात सुद्धा प्रकृतीच आहे एकमेकांचे अंतरंगच आपण जर... मग आपल्यात कसे आले अंतर? संकुचित स्वार्थाचे वेड लागले  आपले व समाजाचे आंतर वाढले भोग आणि उपभोगाचा नाद लागला  जो तो प्रकृतीशी प्रतारणा करू लागला शहाणपण असेल तर विचार कर... हिम्मत असेल तर पुरुषार्थ कर! अहंकार सोड आणि जगाकडे बघ  दोघांसोबत सदैव एकोप्याने जग आपले आयुष्य तेव्हाच जिंकेल जेव्हा आपल्यामधले अंतर संपेल

यह सपना देखना जरुरी हैं l

धरती और धरती से जुड़ी हर चीज को, बचाना जरुरी हैं l धरती से मिलकर कर जो बसाया जहां, उसे थामना जरुरी हैं l जो उपभोग कर फेंक दिया,  उसे फिरसे उपयोग में लाना जरुरी हैं l दर असल छीनकर भोगना, भोगकर फेंकना... इस प्रवृत्ति को हीमिटाना जरुरी हैं l अब तो होते होते शाम हुई है, दिन की दौड़ और धूप कम हुई है, शाम की खूबसूरतीभी खत्म हुई है l थका हुआ शरीर और हारा हुआ मन है, चारों ओर निराशा का जाल है, और सामने सिर्फ अंधेरी रात है l इस रात के बाद का मंजर खूबसूरत हो इस उम्मीद को लेकर थोड़ा सुस्ताना जरुरी हैं l हवा भी, झरने भी, पेड़ और पहाड़ भी कीटकभी, पंछीभी,जानवर और इंसान भी साथ जिए तो... लंबा होगा दिन,अच्छाभी होगा दिन l वर्ना रात लंबी,बहुत चिंताओसे भरी  और पश्चातापसे भरी हो सकती है l                       आजके अनुभवसे यह समझना होगा, इसी बात को समझाना जरुरी हैं l फिर सुबह होगी इस उम्मीद को लेकर यह सपना देखना जरुरी हैं l यह सपना देखना जरुरी हैं l