Posts

Showing posts from March, 2022

सार्थकता

सार्थकता ------------ ''दिन'' साजरे होती विविध केवळ "जाणीव'' जागृतीसाठी । यत्न करूया आपण सारेजण जाणीव "जिवंत" राहण्यासाठी।। प्रतिदिन प्रतिक्षण प्रत्येकजण स्मरणात ठेवील ही "जाणीव"। यासाठी होतील त्या कृतीने ते दिन सारे ''सार्थक" होती ।। सार्थक व्हावे ते सारे ''दिन'' सार्थक व्हावी सारी जीवने या मनःपूर्वक शुभेच्छा माझ्या या "काव्यपंक्ती" सार्थक होती।। वैद्य मनोज पाटील  दि.22मार्च 2022 (जागतिक जलदिन

माती चे काम

Image
लललै ललै ललै लललै ललै लैलै। लललै ललै ललै लालै ललै ललै।। जादू असेही माती बिजास फळ बनविती। पाण्यास शोषून घेती ते पाणी "नदीस" देती ।। उन्हात सावली ती पक्षास घरटी ही । सर्वास आधार जी ती त्या वृक्षास"आधार" देती।। आरोग्य तिचे बिघडले आमचेच हो चुकले। निर्धार सुधारणेचा करती तिचीच बाळे।। आसमंतात विष वाढले जी त्यालाही शोषून घेती। त्या मातीस पोसती जे जे मज प्रिय "मित्र" ते ते।। (वैद्य मनोज पाटील. 21 मार्च (इक्विनॉक्स) 30 हजार किलोमीटर ची यात्रा लंडन ते कावेरीखोरे पर्यंत 52 लाख शेतकऱ्यांचे जीवन कार्य-  जिथे 4 करोड 20 लाख वृक्षांचे रोपण झाले आहे,83 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्रावर. 192 देशांना जागवण्यासाठी... कॉन्शस प्लॅनेट अभियान शुभारंभ निमित्त)

पाणी उपक्रम (रोटरी मीटिंग)

गुरुवार दिनांक तीन मार्च दोन हजार बावीस रोजी रोटरी क्लब सांगली च्या मीटिंग मध्ये वॉटर आणि सनिटेशन यानिमित्ताने पर्यावरणाच्या अंगाने जो विषय मांडण्यात आला , त्या विषयाचे शब्दांकन... नमस्कार मित्रहो, पावसाळ्यामध्ये आपण स्वाभाविकपणे वृक्षारोपणाचे काम करतो. दीपावली नंतरचे चार महिने आपण  सामान्यताः कचर्यासंबंधीचे काम करतो. फेब्रुवारी, ओप्पोमार्च, एप्रिल, मे हे महिने आहेत पाण्यासंबंधी काम करण्याचे!   पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे एक ऋतुचक्र आहे. पुढील तीन महिन्याचा विचार करता सर्वांना पाण्याची तीव्रतेनं आठवण होत असते. पाणी... वाचवले पाहिजे. साठवले पाहिजे. पाण्याचे स्रोत शुद्ध ठेवले पाहिजेत. जे अशुद्ध झाले आहेत त्यांना शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सांडपाण्याचा निचरा पण व्यवस्थित झाला पाहिजे. त्या सांडपाण्याचा योग्य पुनर्वापर करता येईल का? त्या सांडपाण्यावर प्रक्रिया होण्यासाठी काय करायला हवे? कृषी क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन अथवा फवारा सिंचन पद्धतीचा वापर व्हायला हवा. खतांचे वापर करत असताना विवेक ठेवायला हवा. यावरूनच आपल्या समोर येतात... पाच कलमी कार्यक्रम आणि उपक्रम:- १....

चिरंजीव पारस वाढदिवस अभिष्टचिंतन

चिरंजीव पारस,अनेक आशीर्वाद!        आज तुझ्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होत आहेत. कायद्याच्या दृष्टीने तु एक सज्ञान व्यक्ती झाला आहेस. आता तुला कायद्याने दिलेले सर्व अधिकार स्वतंत्रपणे उपभोगता येतील.       नाण्याला जशा दोन बाजू असल्याशिवाय ते नाणे 'खरे' मानले जात नाही, त्याप्रमाणे अधिकाराने संपन्न असलेली व्यक्ती कर्तव्याच्या जाणिवेने परिपूर्ण नसेल तर त्याला 'खोटे' नाणे म्हणावे लागेल. मला कल्पना आहे, तुला स्वतःलाच तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या सर्व अपेक्षा...मला अपेक्षित असलेप्रमाणे कुटुंब, समाज, राष्ट्र,धर्म  यासंबंधीच्या अपेक्षा पूर्ण करणार्याच आहेत. त्यामुळे मी नवीन अपेक्षांचे ओझे लादणार नाही.      आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुला काही नवे अनुभव येतील. ते अनुभव तुला घडवतील. अधिक संपन्न बनवतील. ही संपन्नता सहजपणे प्राप्त होणारी आहे. या संपन्नते मधून तुला अधिकाधिक आनंद मिळावा आणि तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचा व्हावा. अशी तुला मनापासून शुभेच्छा!        प्रथमदर्शनी काही अनुभव सुखावह असतील. काही अनुभव ...