दुर्घटना
*दुर्घटनाच ती! पण आपण बोध घेऊ शकतो.* दक्षिण भारत जैन सभा अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला गोंधळ पाहून समाजातून प्रचंड तिखट अशा प्रतिक्रिया येत आहेत.126 वर्षाच्या सभेच्या दैदिप्यमान इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना कशामुळे घडून आली?? याबद्दल सर्वजण आपापल्या परीने तर्क लढवीत आहेत. प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. निराशेला शब्दबद्ध करीत आहेत.हत:प्रभ...हताश...उदास झाल्याप्रमाणे आपल्या आपल्या माना खाली घालत आहेत. "आपलेच दात आपलेच ओठ ",म्हणून गप्प बसत आहेत. प्रचंड निराशेच्या अंधकारात मात्र आशेच्या चांदण्यासुद्धा आसमंतामध्ये चमकत आहेत. आपला सुसंस्कारित सभ्य समाज हे ते "पवित्र आसमंत" आहे. त्याला जगज्जेत्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. तेजपुंज तपस्वींच्या ज्ञानाचा प्रकाश आहे. तीर्थंकरांच्या महान विजयाचा इतिहास आहे. "जे त्रिकालाबाधित सत्य आहे ते संपणारच नाही.", "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता!" या वाक्यांवर श्रद्धा असलेला आपला समाज,अबाधितपणे मार्गक्रमण करत आहे, करत राहील... अशा सोज्वल,निरागस समाजभावनांच्या वर "...