संयुक्त चिकित्सा सहयोगी चिकित्सा)
( संयुक्त उपचार भाग )
संयुक्त उपचार म्हणजे सहाय्यक उपचार!
एकापेक्षा अधिक उपचार पद्धतींचे एकमेकांना सहाय्यक होणे.कधी पेशंटना तात्काळ उपचार आराम पडण्याची आवश्यकता असते. कधी पेशंटना औषधाचे साइड इफेक्ट पासून वाचवावे लागते. "वाचवावे लागते " म्हणजे एखादवेळेस त्या पेशंटला विशिष्ट औषधांची हाइपर्सेंसितिविटी रिॲक्शन येत असते. आणि एखादे वेळी उपचरातून होणारे साइड इफेक्ट ,आजारा पेक्षा घातक असू शकतात. मग अशावेळी सामान्य पणे साईड इफेक्ट चा त्रास कमी होईल अशा प्रकारची औषधे मूळ आजाराच्या औषधी बरोबर दिली जाऊ शकतात. पण दोन चार दिवसाचा उपचार असेल तर हे ठीक आहे.तेही टाळता आले तर बरेच आहे. पण खूप काळ चालणारा उपचार असेल तर, किती औषधे खावी लागणार बरे?यामुळे औषधाचा खर्चही वाढू शकतो आणि त्या दुसऱ्या औषधांनाही काही साईड इफेक्टस् असू शकतात.
एकूणच औषधे तात्कालिक द्यावयाची व्यवस्था असावी. ठराविक उपचारानंतर आजार बराच झाला पाहिजे. काही आजार असाध्य असतात असे मानले जाते. त्याला आयुष्यभर औषध घ्यावे लागते. अन्य उपचार पद्धतीमध्ये तो आजार घालवण्याची सोय असेल तर आयुष्यभर आणि अपायकारक औषध एका घ्यावीत बरे?
माणसाचा जो नेहमीचा आहार आहे तो आपल्या शरीरातील सर्व अवयवांना सवयीचा झालेला असतो.( यालाच आयुर्वेदामध्ये ' सात्म्य ' असे म्हणतात) कोणतीहीऔषधे पचवण्यासाठी लिव्हरला थोडे अधिक काम करावे लागते. जास्त झालेला औषधाचा भाग शरीरातून बाहेर काढण्यासाठी किडनीला अधिक काम करावे लागते. कोणत्याही अवयवाला अचानक अधिक काम करावे लागणे म्हणजे कालांतराने त्याच्यामध्ये काही बिघाड होणे याची शक्यता आहेच. हे टाळणे निश्चितच शक्य आहे.
शिवाय आपली एक सार्थ अपेक्षा असते ''औषध हाच आहार'' बनवू नये ."आहार हेच औषध" बनले तर ठीक आहे. त्यातूनच आहारतज्ञ अशी एक नवी फॅकल्टी निर्माण झाली असावी. मग आहार शलेची काही तत्वं प्रचलित असलेल्या जीवन शैली मधून किंवा उपलब्ध असलेल्या ग्रंथांमधून काय हरकत आहे? हवे तर त्या पद्धतींचे टेस्टिंग व्हावे. प्रत्येक वेळी प्रयोगशाळेत टेस्टिंग करणे कदाचित शक्य होणार नाही. मग रुग्णांवर टेस्टिंग व्हावे. का पासून चालत असल्यामुळे रुग्णांवर टेस्टिंग करण्याचे काही धोके आहेत असे म्हणण्याचे हि कारण नाही. प्रयोगशाळेमध्ये टेस्टिंग प्रत्येक वेळी करता येणार नाही कारण टेस्टिंग साठी असलेले निकष आणि प्रत्यक्षात वापरासाठी असलेले निकष यांचा मेळ बसणार नाही.
पण प्रत्येक वेळी आहारच औषध बनू शकेल असा आग्रह,“ दुराग्रह” म्हणावा लागेल. नेमके कोणते द्रव्य कमी झाले आहे किंवा वाढले आहे अथवा कमी झालेले द्रव्य जसेच्या तसे आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन चे असे द्यावे लागते. दुष्परिणाम करणारे द्रव्य शरीरात तयार झाले असेल तर त्याला न्यूट्रल किंवा नष्ट करणारे अन्य द्रव्य द्यावे लागते . तसे ते देण्यामध्ये ऍलोपॅथिक शास्त्राची महारत आहे.ज्याप्रमाणे कोणतेही शस्त्र शत्रूला अपाय करू शकते तसेच तेच शस्त्र वापरण्याचे कौशल्य अंगी नसेल तर ते ज्याच्या हाती आहे त्याच्यासाठी घातक ठरू शकते. मग वापरण्याचे पुरेसे कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्तीने चा त्याचा वापर केला पाहिजे.
त्याचे पुरेसे संशोधन होण्यासाठी प्रचंड काळ जावा लागतो.जेवढे संशोधन झाले आहे ते सर्व माहीत होण्यासाठी ही आपला थोडा वेळ आणि श्रम द्यावे लागतात. जे हजारो वर्षापासून वापरात आहे त्याला 'टाईम टेस्टेड' असे म्हणतात. त्याचा उपयोग करून आपण मात करू शकतो . त्याचा अनुभव मला अनेकदा येतो. उदाहरणार्थ ऍलोपॅथीच्या उपचाराने तात्काळ आराम देणे शक्य आहे .ते औषध जर दीर्घकाळ द्यावे लागणार असेल तर आयुर्वेदाची लिव्हरला वाचवणारी औषधे सर्वांना माहीत आहेतच . वापर करायला काय हरकत आहे?
आता आपण पाहिले एक उपचार पद्धत त्वरित परिणाम देते. दुसरी उपचार पद्धती साईड इफेक्ट पासून संरक्षण करते.
आयुर्वेदामध्ये एक्सट्रॅक्ट काढून उपचार करणे फारसे प्रचलित नाही. सत्व काढण्याची संकल्पना आहे. परंतु त्यालाही काही मर्यादा व नियम आहेत. सामान्यतः संपूर्ण द्रव्य वापरण्याची पद्धती प्रचलित आहे. त्यामुळे त्या द्रव्यांमध्ये असलेल्या अल्कलोईड बरोबर सहयोगी(कॉम्प्लिमेंटरी )आणि सांभाळून घेणारे(कॉमपेंन्सेटरी) दोन्ही प्रकारचे घटक (इन्ग्रेडियंट) नैसर्गिकपणे आढळतात . हे नैसर्गिक मिश्रण नैसर्गिकपणे रुग्णाच्या उपचाराला मदत करतात. उदाहरण द्यावयाचे झाल्यास ..."जा रे, अमुक एक काम करून ये" असा आदेश नोकराला देणे आणि काम करून घेणे हा एक प्रकार झाला." चल मित्रा, मिळून हे काम करून घेऊ.'' असे खांद्यावर हात टाकून काम करून घेणे हा दुसरा प्रकार झाला. जिथे जो वापरायला हवा तिथे तो वापरायला हवा ,नाही का?
असंच सौंदर्य आहे वेगवेगळ्या उपचार पद्धतीचं? रुग्णाचे कल्याण हेच जर ध्येय आहे तर, संयुक्तपणे वापरायला काय हरकत आहे?
Comments
Post a Comment