अवखळ श्रावण
अवखळ श्रावण --------------------- श्रावण महिना अवखळ भारी सकाळच्या पारी चमचम सारी. दुपार असो वा संध्याकाळी.. सूर्या मधली दाहकता गाळून अनोखी झळाळी सृष्टीला देणं. आधीच धुतलेली ओली ती सृष्टी भुरळ पाडी मनाला भारी. मंद किरणांचे मधुर आवतन मनाचं आपसूक मोहून जाणं. सोडूनी घरदार पडे मी बाहेर. हिरव्या पदराच्या, सोनेरी बाहूंच्या, धुंद वाऱ्याच्या, कुंद कोंदणी, खोल स्वतःला बुडवून पहाणं. तोडून सारे बंध, सोडून सारे दंभ, निघालो एकाकी होऊन मुक्त. श्रावण सौंदर्याचा समर्पित भक्त. असा मी विरक्त तसा मी असक्त अनोख्या मोहाला साफ फसणं . फसलेला भोळा हसलेली सृष्टी अचानक होते मेघांची वृष्टी. तसे पावसाळे कितीक पाहिले... तरीही फसते मन? हसते का चिडते, कसे वर्तते मन? रडते का शिकते, काय करते मन? हा तर अवखळ प्रेमळ श्रावण गोड शिक्षा अन.. मोठे शिक्षण! गोड शिक्षा अन.. मोठे शिक्षण! ***** असंख्य येती आपुल्या जीवनी कितीक मधुर आमंत्रणे... घेऊन जाती आडवळणी अन फसवून नेति...