संयुक्त उपचार - एक गरज, एक अपूर्व संधी!
कोरोनाचा हाहाकार संपूर्ण जगामध्ये माजला. त्याचा प्रतिकार करण्याची अनेकाची पद्धत निराळी. काही लोकांनी नवनवीन पद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांनी प्राप्त झालेल्या प्रोटोकॉल ला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना अनेक अनुभव आले परंतु या वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांना खूप काही शिकविले. आपण जर नाही शिकले तर आपण माणूस कसले?
एकदा का ब्लड प्रेशर वाढला तर आयुष्यभर गोळी खावी लागणार या संकल्पनेने ब्लड प्रेशर या परिस्थितीबद्दल अनावश्यक भय निर्माण केले आणि त्या भयामुळे अनावश्यक गुंतागुंत रोग्यामध्ये वाढू लागली. मग ब्लड प्रेशर मॅनेज करणे कदाचित सोपे असेल पण ही गुंतागुंत मात्र भलती अवघड ,नाही का ?
यकृताचा आजार झाला तर बऱ्याचदा आयुर्वेदिक औषधाकडे वळतात आणि त्याचा लाभ ही चांगला होतो. पण यकृताचा आजार ओळखण्याचे तंत्रज्ञान मात्र आधुनिक उपचार पद्धतीच्या मदतीने कमालीचे सोपे आणि खात्रीचे झालेले त्याला पाहायला मिळते. इथे आपण दोन उपचार पद्धतींचे एकत्रितपणे लाभ घेत असतो. कधी कधी कुठे कुठे आणि कसे कसे लाभ घेऊ शकतो याचा अभ्यास नको का व्हायला?
आपल्या वैद्यकीय व्यवस्थेचा हेतू रोगी व्यक्तीची रोगमुक्ती आणि निरोगी व्यक्तीसाठी रोग न होण्याची युक्ती असाच जर असेल तर या गोष्टीसाठी जे जे उपाय मिळतात त्या उपायांचा उपयोग करायला काय हरकत आहे?
जी व्यक्ती एखाद्या उपचार पद्धतीचा अभ्यास करते. त्या उपचार पद्धतीने शिकवलेल्या मुलतत्वे नुसार विचार करू लागते. दुसऱ्या उपचार पद्धतीची मूलतत्त्वे जर दुसरी असतील तर एका उपचार पद्धतीच्या मूलभूत तत्त्वांच्या निकषानुसार दुसऱ्या उपचारपद्धतीचा निष्कर्षा बद्दल कशी काय भाष्य करता येणार बरे? त्यासाठी हे वास्तव मान्य करावे लागेल. हृदयाला अधिक उदार आणि आपल्या नजरेला अधिक विस्तृत बनवून त्यांच्या प्रकाशामध्ये निष्कर्षण कडे पहावे लागेल तसे केले तर नक्कीच काही समान धागे पाहायला मिळतील आणि त्या समान धाग्यावर विचार करून उपचार राचा गुंता सोडवता येईल.
आज असे अनेक जण करत आहेत. कोरोना काळामध्ये याची प्रचिती अत्यंत प्रकर्षाने होते आहे. सर्वच उपचार पद्धतींच्या वैद्यान मध्ये एक प्रकारचा आत्मविश्वासंच आलेला दिसतो आहे. तो आत्मविश्वास खचितच फाजील नाही. अंधपणे विश्वास ठेवणारा लोकांचा अंधविश्वास फाजील असू शकतो पण जानी रोग्यांच्या हितासाठी आपल्या प्राणाला आणि प्रतिष्ठेला पणाला लावले आहे आणि अनेक प्रयोग डोळसपणे केले आहे त्याचे आश्चर्यकारक असे लाभ रुग्णाला मिळवून दिले आहे त्यांचा आदर व्हायलाच हवा.
याचा अर्थ असा नव्हे फक्त आणि फक्त संयुक्त उपचार पद्धती सर्वांनी वापरली पाहिजे. एकेका उपचार पद्धतीचाही सर्वांगाणे विकास होणे तेवढेच गरजेचे आहे. परस्पर संवादाचा मार्ग मुक्त राहिला पाहिजे . स्वतःच्या उपचार पद्धती मधील दोष स्वीकारण्याचा मोठेपणा व अन्य उपचार पद्धती मध्ये असलेले चांगले गुण स्वीकारण्याचा मनमोकळेपणा हे गुण मात्र सर्वांमध्ये असायला हवेत.
यासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या पातळीवर एक गोष्ट स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ती म्हणजे एका पॅथी ची पदवी घेतलेल्या व्यक्तीला दुसऱ्या पॅथीच्या मूलतत्वांचे आणि चिकित्सा पद्धतीचे शिक्षण पाण्याची सोय व्हावी.
आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी आणि युनानी औषधांना या काळामध्ये लोकाश्रय तर मिळालाच आहे. राजाश्रय मिळायचा असेल तर एका बाजूला राजाला दृष्टी असायला हवी आणि दुसऱ्या बाजूला राजाच्या दृष्टीमध्ये येण्यासारखे दैदिप्यमान काम आणि केलेल्या कामाची परिणामकारक मांडणी करता आली पाहिजे. तरच संपूर्ण जगामध्ये संधीचा फायदा घेऊन आपण एक उत्तम पध्दती निर्माण होण्यासाठी मार्गक्रमण करू शकू.
हा पर्याय म्हणजे इंटिग्रेटेड ॲप्रोच किंवा फ्युजन अॅप्रोच किंवा संयुक्त उपचार पद्धती कोणत्याही नावाने उलेख केला तरी पुरेसे स्पष्टीकरण नावामधूनच मिळून जाते. आज याची आवश्यकता आहे हे निसंशय!पण हे छातीठोकपणे मांडू शकतो का? हा खरा प्रश्न आहे.
आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपण प्रतिसाद द्यावा. एकविसाव्या शतकात एक नवं लेणं तयार करण्यासाठी ! माणसाच जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी! रोगांच्या आव्हानांना परास्त करून विकासाच्या मार्गावर अधिक गतिमान होण्यासाठी!
Comments
Post a Comment