घर आणि घरघर
घर आणि घरघर
घरातून जाताना "जाऊन येतो" म्हणावे,
'जाऊन इथेच परत येऊ' असेच वाटावे.
घरामध्ये येतानाच जायचे नियोजन?
मनात नक्की काहीतरी खदखदत असावे.
खदखद कसली ती न सांगता कळावी
तरच तिथे आपलेपणा समजावा.
अन्यथा नुसतीच माणसे, नुसतीच नाती
असा लादलेला मेळावा नसावा.
आपला आपला अहंकार नि पूर्वग्रह,
वाळवीप्रमाणे 'पोखरतो' पूर्ण घराला.
अभिमानही संपूर्ण घराचा असावा
तोच बळ देतो घरातील प्रत्येकाला.
चांगला जोडीदार,चांगली मुले
मिळाली म्हणून 'नशिब' समजावे.
गृहीत त्यांना धरू नये,'जपावे,'
ते घरी आल्यावर आनंदी दिसावे.
स्वार्थ असेल तर परिवाराचा असावा,
मोठा असावा पण संकुचित नसावा.
'व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाचे असते'असा
सर्वांच्या चिंतानाचा विषय असावा.
चांगुलपणा केला असेल तरी
कधी शब्दातून व्यक्त न व्हावा
कर्तेपणाचा भाव नसावा,
न बदलता येणारा 'स्वभाव' समजावा
कधी शब्दातून व्यक्त न व्हावा
कर्तेपणाचा भाव नसावा,
न बदलता येणारा 'स्वभाव' समजावा
चांगला मुलगा, चांगली मुलगी
एवढेच असून कुठे भागते?
चांगला संसार होण्यासाठी
वेगळे 'चांगले' असावे लागते.
वैद्य मनोज पाटील दि. 10/03/2026
Comments
Post a Comment