उ:शाप हवा आहे आम्हाला.

कविता 1

शब्दांचे बुडबुडे
बुडबुडातल्या प्रतिमा
प्रतिमांच सौंदर्य
सौंदर्याचा विलास
नाही भुलवत आम्हाला..

पाण्याची शुद्धता,
शुद्धतेचा प्रवास
प्रवासातून पोषण 
पोषणातून होतं जे निर्माण
त्याची आस आहे आम्हाला.

शब्दांचे वावडे नाही...
शब्दांच्या भावना 
भावनेचा अर्थ,
अर्थानुसार कृती 
अपेक्षित आहे आम्हाला.

वक्तृत्वामागे असावी तपस्या
तपस्येचे तेज
तेजाचा प्रकाश नि ऊर्जा,
विनाशाच्या शापाला 
उ:शाप हवा आहे आम्हाला.

 मनोज पाटील 
दिनांक28/ 2/26

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)