अंतर

तसा आपला समाज खूप छान आहे त्यासोबतच आनंदाला खरं उधाण आहे

प्रकृती किती संपन्न आणि सुंदर
सुखशांतीयुक्त जीवनाचे एक मंदिर आहे

सगळ्यांचाच मिळून हा समाज आहे आपण सगळे समाजाचे अंतरंग आहे

आपल्या अंतरंगात समाज आणि प्रकृतीच्या अंतरंगात आपण आहे.

प्रकृतीची किती रूपे अनंत नी आगाध
आपल्या अंतरंगात सुद्धा प्रकृतीच आहे

एकमेकांचे अंतरंगच आपण जर...
मग आपल्यात कसे आले अंतर?

संकुचित स्वार्थाचे वेड लागले 
आपले व समाजाचे आंतर वाढले

भोग आणि उपभोगाचा नाद लागला 
जो तो प्रकृतीशी प्रतारणा करू लागला

शहाणपण असेल तर विचार कर...
हिम्मत असेल तर पुरुषार्थ कर!

अहंकार सोड आणि जगाकडे बघ 
दोघांसोबत सदैव एकोप्याने जग

आपले आयुष्य तेव्हाच जिंकेल
जेव्हा आपल्यामधले अंतर संपेल


Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)