थोडा तरी वेळ द्या.


एक वेदना प्रसवाची 
भोगण्या तरी वेळ द्या.
किमान कविता तरी जन्मावी
इतका तरी वेळ द्या.

एक अत्याचार विसरण्या,
कळ त्याची शांत होण्या,
जखमा पुसून पुण्यांदा...
उभे राहण्यातरी वेळ द्या.

वेदनेच्या या कवितेला
पुरस्कार नकोच आहे.
वेदना पुसावी कोणाचीतरी
फक्त इतकाच आधार द्या.

सृष्टी नित्य हसावी,
आणि मानवता सुखे वसावी.
सृष्टीला "संवेदना" हवी आहे,
अरे,अस्तित्वाला तरी वेळ द्या.

कविता असो वा वेदना!
त्याने उपायांचा जन्म व्हावा.
क्रांतीचा रक्तपात थोपावया
अरे,थोडा तरी वेळ द्या.

-डॉ मनोज पाटील


Comments