जगणं
*जगणं*
----------
कधी अपेक्षित, कधी अनपेक्षित
हेच अपेक्षित असण म्हणजे जगणं
जे अपेक्षित ते कधी चांगलं कधी अपेक्षित वाईट
कधी अनपेक्षित चांगलं, कधी अनपेक्षित वाईट
बरं वाटलं तर होतो हर्ष
नाही वाटलं तर असतो विषाद
हर्ष असो वा विषाद असो
दोन्ही असतात क्षणिकच!
हे समजण म्हणजे जगणं.
अपेक्षित असं घडत जातं
त्याला आपण जीवन म्हणतच नाही
कदाचित !
अनपेक्षित घडलं तरच त्याला म्हणतो " घटना"
त्या घटनांचे अर्थ सुद्धा
प्रत्येकाचे निरनिराळे...
त्या घटनातून
त्या अर्थांतुन
जे जे निपजते,
आनंद... दुःख... आश्चर्य...
त्यास एक एक रंग मानुनी
एक विशाल चित्र रंगवीत बसणं म्हणजे जगणं.
आनंद झाला तर अनुभवावा अल्हाद
आनंदातिशया चा
नसावा अहंकार, नसावा उन्माद.
दुःखाचा ही अनुभवावा खेद
आक्रोश... आक्रांत...
जो जो असेल तो तो.
पण नसावी खंत नसावं झुरणं
चुकणं शिकणं, शिकणं चुकणं, चुकणं शिकणं
म्हणजे जगणं.
कधी ध्येय ठेवूनी लढणं
कधी ध्येय विसरूनी रमणं
दिवसभराचे कष्ट कधी
कधी रात्रीची विश्रांती
यांचं निरंतर "चक्र",
म्हणजे जगणं.
काळ्याभोर आकाशातली चांदण्यांची नक्षी
आणिक काळ्या गडद ढगामागची सोनेरी कडांची झालर
यांचं एकत्रित सौंदर्य म्हणजे जगणं.
चांदी सारख्या चंद्रावरचं
राखाडी गोंदणं,
पंका मधल्या पंकजाच
सौंदर्याचं लेणं,
त्याखालच्या पानावरच्या तेलाच
आणि पाण्यामधल्या जाळीच
आधारच होणं,
हे सगळं असणं म्हणजे जगणं.
हे सगळं असणं म्हणजे जगणं.
Comments
Post a Comment