शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे वर्णन.*
*शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे वर्णन.*
रंगीबेरंगी फुलांच्या रोपांचा आणि वेलींनी सजलेला सुंदर बगीचा.
काही ठळक रंग, काही सौम्य रंगाच्या फुलांचे
गंधही सुखद सुंदर प्रत्येकाचे वेगळे वेगळे.
कर्तव्यदक्ष तरी कर्तव्य कठोर,
संयमी तरी संवेदनशील संचालनाचा सुंदर नमुना!
जगामध्ये फुलांच्या प्रजाती अनेक...
सर्वांचं प्रतिनिधित्व असणारी सर्वसमावेशक सभा.
नवीन फुलणाऱ्या फुलांसाठी अन्नद्रव्य, हवा,
पाणी आणि प्रकाशाची व्यवस्था करणारी यंत्रणा!
शब्दांची भाषा असली तरी भावनांचा प्रवाह!
कधी त्यांचा खळखळाट,
कधी त्यांचा गडगडाट...
सर्वांचा मिळून एका उपवानाचा थाट.
कुठे कारंजा,कुठे प्रपात,
आवश्यक तिथे धीरगम्भीर शांत शांत!
समाजात चमचमणारे काजवे...
इथे त्यांचा लखलखाट!
एकमेकांना प्रकाशाचा प्रसाद देणारा
क्वचित एकमेकांचा सहवास.
चंद्राच्या शीतल प्रकाशात
धरतीचे पोषण करणाऱ्या अनेक रसायनांचे होत होत असते इथे निर्माण.
सुखद,सुंदर धरित्रीच्या अस्तित्वासाठी,
संरक्षण आणि संवर्धनासाठी शक्ती देणारी खाण!
इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटत असेल
मी किती भाग्यवान... मी किती भाग्यवान!
आम्हाला आमच्या मातीचा अभिमान,
माती सुपोषित करणाऱ्या कृतीचा अभिमान,
तरीही कर्तुत्वाचा अभिमान नसणाऱ्या वृत्तीचा अभिमान,
कर्तव्य करून कृतकृत्य झालेल्या स्थितीचा अभिमान,
या बगीचाचे रक्षण करणाऱ्या कुंपणाचा अभिमान,
निर्माण करणाऱ्या निर्मिकाचा अभिमान!
तरी पदोपदी क्षणोक्षणी कर्तव्याची जाण...तरी पदोपदी क्षणोक्षणी कर्तव्याची जाण!
- वैद्य मनोज पाटील
दि. 28 /12 /2024
Comments
Post a Comment