चुकायचं वय आहे...चुकू द्या!
बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या .
चुकांमधून सुद्धा शिकायचे असते,
एकदा केलेली चूक,पुन्हा करायची नसते. चुकांमधून शिकलेले विसरायचे नसते,
शिकू द्या!
शिकायचे काम युक्तीचे असते
आणि थोडे भक्तीचे असते.
भांडे जर भरलेलं असलं,
नाहीतर ते उपड असलं तर...
त्यात नवीन काही भरता येत नसते,कळू द्या . शिकायचं कसं हे पण शिकायचं असते,
शिकू द्या .
बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या .
ध्येय असावे,स्वप्न असावे,असू द्या !
ध्येयाकडे जाणारा मार्ग चालायचा असतो,
हे ही त्याला कळू द्या !
एक मार्ग मळलेला असतो,
एक स्वतःला कळलेला असतो .
नव्या मार्गावर असतात नवी आव्हाने...
ती त्याला झेलू द्या !
बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या!
"स्वप्न रंजन " असते फक्त वेळखाऊ,
योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नाशिवाय
यश मिळत नसते...
त्याच्यासाठी नियोजन करायचे असते, करू द्या !
बिट्टूच वय चुकायचं वय आहे, चुकू द्या .
पूर्वतयारी...सल्लामसलत... पूर्णतयारी...सूक्ष्मतयारी...
उत्तुंग यशाची एक एक पायरी!
प्रत्येक पायरी चढायची असते,चढू द्या !
यशाच्या शिखरावर पोचू द्या !
यशाच्या शिखरावर पोचू द्या!
Comments
Post a Comment