' संवाद' हे पुस्तक लेखांचा संग्रह आहे. प्रस्तुत लेखांमध्ये संवाद एका शिक्षिकेचा आहे... संवाद एका गृहिणीचाआहे... संवाद एका आईचा आहे... संवाद एका आजीचा आहे... संवाद एका विद्यार्थिनीचा आहे... विद्येच्या ग्रहणासाठी आणि विद्येच्या प्रदानासाठी बंडखोरी करणाऱ्या एका कन्येचा आहे... "संवाद" या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे, "संवाद म्हणजे विचारांची आणि भावनांची देवाण घेवाण, माणसा माणसांची मन जोडणारा एक पूल!बदलत्या काळामध्ये संवादाचे रूपच पालटलं,तिथे खऱ्या अर्थाने व्यक्त संवादातून निर्माण होणाऱ्या आपुलकी,जिव्हाळा,आत्मविश्वास यांचा चित्रपट म्हणजे संवाद हे पुस्तक! 'संवाद' असे या पुस्तकाचे नाव आहे. पण त्यांनी जे जे विषय त्यामध्ये हाताळले आहेत त्या विषयांचा अभ्यासू विवेचन त्यांच्या लेखांमध्ये आढळतं. ". संवाद फक्त संवाद नको, तर तो सुसंवाद असावा, संवादात नम्रता असावी ,जिव्हाळा असावा, आपुलकी असावी ,विश्वास असावा ,प्रामाणिकपणा असावा ,गोडी असावी, भावुकता असावी" असं त्या स्वतः लिहितात आणि त्यांच्या लेखनामध्ये ते सर्व दिसून येतात. त्या अर्थाने संव...
Comments
Post a Comment