नोव्हेंबर 2024... निवडणूक काळातील दोन कविता.

1.

कुछ लोग होते है,कभी कुछ मांगते नही, बस देने की कोशिश मे रहते है l 
वो लोक होते है जो, कुछभी दिखाते नही, हमेशा करने की कोशिश मे रहते है l 

कुछ लोग होते हैं जो देख लेते हैं,क्या करने से मशहूर होते हैं,
वही कम काम करनेवाले, दिखाने में लग जाते हैं और मशहूर हो जाते हैं l 

दुनिया में कुछ भला होता है तो वह उन लोगों से होता है जो करते ज्यादा और दिखाते कम है l 
और मशहूर वह लोग होते हैं जो काम करते कम हैं और दिखाते ज्यादा है l 

वो जानते नही जो मशहूर होते है,
जो मशहूर नही,वह कैसे खुश रहते है?
मशहूर होकर वो कितनी खुशी पाते है?
मशहूर न होकर हम कौनसी खुशी पाते है l 

2.

हल्ली काँग्रेसच्या कार्यक्रमात 
मा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लागतो.
भाजपाच्या बॅनरवर सुद्धा 
मा अजित पवारांचा फोटो असतो.
अशी सगळी सरमिसळ बघून
एका अर्थाने बरे  वाटते.

देशभक्त समाजनिष्ठ कार्यकर्ता
असाच विचार करत असतो...
फक्त देशासाठी, समाजासाठी अन मातीसाठी! 
तरी खूप लोक असतात
जे विचार करतात केवळ धर्मासाठी आणि जातीसाठी.

सगळं दिसतंय,पण कळत नाही. 
कळतय, पण वळत नाही.
मातीचा विचार करणारे मातीतच!
आणि फक्त स्वार्थासाठी
धर्म जातीचा विचार करणारे खुर्चीवर!

...या सगळ्या वस्तुस्थितीच्या पोटातून सुद्धा 
एक वाट असेल,
पुन्हा माझ्या भारतमातेला जगतगुरु करणारी!
त्याचसाठी मनात आस आहे.
त्याचसाठी आमचे जीवन आहे.
त्याचसाठी आमचे कार्य आहे.
म्हणूनच आमचे जीवन सार्थ आहे,
आमचे जीवन सार्थ आहे.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)