नाटक


कुणी तरी म्हणून गेलं,
"एक विशाल नाटक सुरू झालय,निवडणुकीचं!"
बरेच जण म्हणतात,
"मीडियाचं नाटक सुरूच असतं... कायमचं!"

आधी माहिती नव्हतं...पण कोणीतरी सांगत होतं ,
"कोर्ट सुद्धा एक नाटक असतं."
आपल्याला तर रोजच दिसतं,
"प्रशासन तर एक नाटक असतं."

खूप दुःख होतं...जेव्हा कळतं,
शिक्षण सुद्धा एक 'नाटक' होतं.
आशेचे सारे दरवाजे बंद करतं 
हॉस्पिटलचं जेव्हा एक 'नाटक' होतं.

मग प्रश्न पडला,नाटकात काय असतं?
"नाटकात म्हणे 'वास्तव' असतं."
म्हणून लोक पाहायला जातात,
कारण जीवनाच 'नाटक' विसरायचं असतं.

संत लोक सांगून गेले,
"सारे जीवनच एक नाटक असतं
वेगवेगळे वेश धारण करून,वेगवेगळ्या वेळी, आपलं आपलं नाटक रंगवायचं असतं."
पुढे जाऊन हे ही सांगत असतात...
"कुठल्याही नाटकात अटकायचं नसतं."
"कुठल्याही नाटकात अटकायचं नसतं."

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)