मातीसाठी गाणे
लललै ललै ललै,लललै ललै लैलै।
लालै ललै ललै,लललै ललै ललै।।
जादू असेही माती
बिजास फळ बनविती।
पाण्यास शोषून घेती
पाणी नदीस देती ।।
उन्हात सावली ती
पक्षास घरटीही ती।
सर्वास आधार जी ती
त्या वृक्षास आधार देती।।
आरोग्य तिचे बिघडले
आहो आमचेच चुकले।
निर्धार सुधारणेचा
करती तिचीच बाळे।।
आसमंतात विष वाढले
जी त्यालाही शोषून घेती।
त्या मातीस पोसती जेजे
मज प्रिय मित्र ते ते।।
पॉलिथिन रसायनांनी
प्रदूषण नित्य होते|
ते टाळा रे मुलांनो!
आई सदा विनविती||
भोगार्थ शोषणाचे
अजस्त्र प्रयोग होती|
रक्षणार्थ त्यागाचे
कित्ते किती गिरवती?
( माती नसे ही माता असे
त्यातच आपले विश्व वसे
मनी आपल्या जाणीव ठसो
माती मातीचा विजय असो!)
Comments
Post a Comment