परवानगी असावी

चुकायला परवानगी असावी 
स्वतःला आणि दुसऱ्यालाही
बदलायला परवानगी असावी
स्वतःला आणि दुसऱ्यालाही

अत्याचार आणि अनाचार
कोण कशाला करेल उगा
संस्कारांची खात्री असावी
स्वतःला आणि दुसऱ्यालाही

बालकासारखे बघायला हवे
कुतूहलाने व निरागसपणे
प्रत्येक वेळी परीक्षणाचा भाव
निष्कर्षाची हाव कशाला हवी

अंतरातल्या दिव्यत्वाची जाण
जगाची लाज व धर्माची चाड
परंपरांचा अभिमान असेलचकी
स्वतःला आणि दुसऱ्यालाही

चुकायला परवानगी असावी 
स्वतःला आणि दुसऱ्यालाही
बदलायला परवानगी असावी
स्वतःला आणि दुसऱ्यालाही

काय बदलायचे, काय नाही
कधी कशी करायची प्रतिक्षा
कसे बदलायचे शिकत रहावे
स्वतःला आणि दुसऱ्यालाही

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)