शब्द माझे.

शब्द कधी हसविती आणि शब्द कधी रडविती.
शब्द माझे प्रयत्न करतील जीवने सुखी करण्यासाठी.

गंध असतो धर्म असतो ,शब्दांनाही दंभ असतो.
शब्द माझे साधन बनतील ध्येय साध्य करण्यासाठी.

वेदनांची महाकाव्ये, आणि त्यांची दुकानदारी.
शब्द माझे ती मोडतील, शांत जगाला करण्यासाठी.

शब्द कधी मनोरंजन, शब्द कधी ज्ञानरंजन.
शब्द माझे बीज होतील नवनिर्माण करण्यासाठी.

शब्द दिलासा शब्द इशारा शब्द बाण कधी
शब्द माझे पुढे येतील वेदनेवरती फुंकर मारण्यासाठी

शब्दांना माझ्या बाजार नको आहे
शब्दांना माझ्या साथ हवी आहे.
शब्दांनीच शब्दांचे कौतुक व्हावे
त्याहून हवे कार्य काही उभे राहावे.
सर्वांनी सुखी व्हावे,मनाने निरोगी राहावे
जीवने आणि जगत सारे हसावे,हसत रहावे.
इतुकेच मला हवे आहे, इतुकेच मला हवे आहे.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)