मनिषा

श्वासांचा गंध तुझा
मी घेऊन धुंद झालो ,
धावणारा मी सदा 
थोडासा मंद झालो.
ओघळणाऱ्या त्या बटांना 
हलकेच बोटाने नीट कर ना,
पाहून तिरपेच मजकडे
स्मित कर अन् घायाळ कर ना.

शब्द तुझे झेलण्याला
कान हा अधीर झाला,
नाद त्याचा, सूर त्याचा,
भाव त्याचा मज घेऊ दे ना.
त्या शब्दांचे गीत होतील
त्यास मजला गावू दे ना,
पैंजणाचे नाद ऐकून 
अपसूक मना धावू दे ना.

क्षण माझे सार्थ होती 
अर्थ लाभे जीवना ,
दोन पावले मजसवे तू 
हात हाती देऊन चाल ना.
तू अग्निबाण माझे, मी उपग्रह आहे,
कोठे नेऊन ठेवायचे, तुझ्याच हाती आहे.
माता पिता प्रक्षेपण केंद्र, मित्र इंधन माझे ,
कर्तव्यात सदा रहावे , मनिषा एवढीच आहे.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया