परिवार मंत्र
माझ्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी...
परिवार मंत्र
आपण सगळे माणसं आहोत,
सगळ्यांना चुकायला परवानगी आहे.
आपण चांगलेच आहोत सगळे
एकमेकावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?
दुसऱ्यांच्या चुकांना सोसायला यावे.
स्वतःच्या चुकांना हसायला यावे.
कसे असावे.. कसे नसावे.. असे कशाला हवे?
जे जसे आहेत तसे स्वीकारायला काय हरकत आहे?
क्रोध मदिरा, भाषेवरचा सुटतो दोरा
अहंकारसुद्धा एक नशाच वेगळी
होते प्रत्येकाची जागी ..कधी कधी,
क्षणात विसरून जायला काय हरकत आहे?
क्षमा करून टाकू सर्वांना प्रत्येक वेळी
स्वतःलाही क्षमा करू प्रत्येक वेळी
देव नाही आपण ...आणि समोरचा ही
वेगळेपण जपू देवू ज्याला त्याला.. काय हरकत आहे?
विचारले तरच सल्ला द्यावा
मागितली तरच मदत करावी
अंतरीचा भाव चांगला.. राहू दे आतल्या आत
प्रत्येकाची वेगळी मते व पध्दती, काय हरकत आहे?
कशाचेच नको प्रदर्शन, असे व्हावे धर्माचे पालन .
धर्माची आहे शक्ती,कधीतरी कळेल त्याचे त्याला
आज नाही पटले तर राहू दे
'देखो,जानो,बिगडो मत'म्हणायला काय हरकत आहे?
तुझ्या भल्यासाठी मी तडफडावे
माझ्या भल्यासाठी तू तडफडावे
मग घरामध्ये सुख कसे नांदावे?
फार आग्रह नको,फक्त भाव करू.. काय हरकत आहे?
टोकाचे विचार, टोकाचे निर्णय, टोकाचे निष्कर्ष
टोचत असतात आपल्याला आणि इतरांनाही
कशाला बनायचे काटेरी झुडप,
विशाल वडाची सावली बनायला काय हरकत आहे?
(वैद्य.मनोज पाटील,30 ऑक्टोबर 2023)
परिवार मंत्र
आपण सगळे माणसं आहोत,
सगळ्यांना चुकायला परवानगी आहे.
आपण चांगलेच आहोत सगळे
एकमेकावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?
दुसऱ्यांच्या चुकांना सोसायला यावे.
स्वतःच्या चुकांना हसायला यावे.
कसे असावे.. कसे नसावे.. असे कशाला हवे?
जे जसे आहेत तसे स्वीकारायला काय हरकत आहे?
क्रोध मदिरा, भाषेवरचा सुटतो दोरा
अहंकारसुद्धा एक नशाच वेगळी
होते प्रत्येकाची जागी ..कधी कधी,
क्षणात विसरून जायला काय हरकत आहे?
क्षमा करून टाकू सर्वांना प्रत्येक वेळी
स्वतःलाही क्षमा करू प्रत्येक वेळी
देव नाही आपण ...आणि समोरचा ही
वेगळेपण जपू देवू ज्याला त्याला.. काय हरकत आहे?
विचारले तरच सल्ला द्यावा
मागितली तरच मदत करावी
अंतरीचा भाव चांगला.. राहू दे आतल्या आत
प्रत्येकाची वेगळी मते व पध्दती, काय हरकत आहे?
कशाचेच नको प्रदर्शन, असे व्हावे धर्माचे पालन .
धर्माची आहे शक्ती,कधीतरी कळेल त्याचे त्याला
आज नाही पटले तर राहू दे
'देखो,जानो,बिगडो मत'म्हणायला काय हरकत आहे?
तुझ्या भल्यासाठी मी तडफडावे
माझ्या भल्यासाठी तू तडफडावे
मग घरामध्ये सुख कसे नांदावे?
फार आग्रह नको,फक्त भाव करू.. काय हरकत आहे?
टोकाचे विचार, टोकाचे निर्णय, टोकाचे निष्कर्ष
टोचत असतात आपल्याला आणि इतरांनाही
कशाला बनायचे काटेरी झुडप,
विशाल वडाची सावली बनायला काय हरकत आहे?
(वैद्य.मनोज पाटील,30 ऑक्टोबर 2023)
Comments
Post a Comment