मी आहे स्वतंत्र सजग
-----------------------
मला आहेत माझे 'डोळे', मी पाहू शकतो माझ्या भोवताली.
मला आहे माझी 'दृष्टी', माझ्या संस्कार नि अनुभवातून आलेली.
भूतकाळातले काही सांगू नका, एकाच भूतकाळाच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत मी.
भविष्य काळाचे बोलू नका,तो घडवण्यास समर्थ
आहे मी.
कुणाच्यातरी दुःखाचं गाणं कुणाच्यातरी तोंडून ऐकून रडणार नाही मी
माझ्या शक्तीनिशी समोर येणाऱ्या दुःखिताचे अश्रू पुसायला समर्थ आहे मी
ज्यांची बोलण्याचीच 'दुकाने' आहेत,'माल' त्यांचा खरीदण्यासाठी बांधील नाही मी.
मी आहे स्वतंत्र सजग , कुणाचेही ऐकण्यासाठी मूर्ख नाही मी.
मला आहेत माझे 'डोळे', मी पाहू शकतो माझ्या भोवताली.
मला आहे माझी 'दृष्टी', माझ्या संस्कार नि अनुभवातून आलेली.
Comments
Post a Comment