उत्तर
उत्तर
-----
अस्वस्थ होऊ नको मित्रा...
खऱ्या लोकशाहीकडे जाण्याचा घे पवित्रा.
नेत्याभोवती फिरणारी लोकशाही हवीच कोणाला होती?
जनतेभोवती फिरणारी खरी लोकशाही हवी आहे आता .
नको तितकं महत्त्व देत आहोत आपणच त्यांना,
आपलं म्हणजे जनतेचं काय महत्त्व आहे,
ते कळू दे की सगळ्यांना.
आपल्या सगळ्यांना गटागटामध्ये वाटून
स्वतःच दुकान चालवणाऱ्यांना
सांगूया आपण आपल्या कृतीनं...
आपल्या भोवतालच्या समस्या सोडवुया
आपणच आपल्या हिमतीनं.
संकुचित स्वार्थ ,छोटे छोटे अहंकार
आणि गाडून टाकू पूर्वग्रहांना
कष्टात असलेल्याला हात देऊ
मागे पडलेल्याला साथ देऊ
पुढे जाणाऱ्यांना वाट देऊ
आपल्या वातावरणाची काळजी आपणच घेऊ
राजकारणाच्या मंचावर ,मिडीयाच्या पडद्यावर
जे चालते ते केवळ 'नाटक' म्हणून पाहू ,
ते केवळ 'नाटक'म्हणून पाहू .
Comments
Post a Comment