चला जीवनावर प्रेम करूया


मी सुंदर मी हुशार मी चतुर
माझे बरोबर माझे छान माझे योग्य माझे महान
कशा कशावर प्रेम करतो आपण
चला जीवनावर प्रेम करूया.0

कशाला फुशारकी छोट्या छोट्या यशांवर,
आपण काही काळ चमकलो त्या थोड्या थोड्या क्षणांवर?
जीवनातल्या अनेकविध अनुभवांवर,
अडचणींवर आणि संकटांवर,
त्यातून प्राप्त होणाऱ्या आनंदावर
आणि शहाणपणावर प्रेम करूया .
तशी संधी मिळाल्याबद्दल जरा कृतज्ञ राहूया.
चला जीवनावर प्रेम करूया.1

मी काय वाचलो, मी काय शिकलो,
मला किती माहिती आहे त्याची फुशारकी कशाला?
माहिती किती आगाध आहे
ज्ञान किती अनंत आहे 
एक सागर आहे डुंबायला 
त्याच्या भव्यतेवर प्रेम करूया 
आपण जे जाणतो त्यातून आनंद किती निर्मिला ते पाहूया.
चला जीवनावर प्रेम करूया.2

मी मी, माझे माझे क्षणभंगूर सारे
आज असेल उद्या नसेल त्याची फुशारकी कशाला?
सत्य किती सुंदर तत्त्व कोणते शाश्वत आहे
मी,माझ्यातला कोणता अंश क्षणभंगुर 
आणि कोणता अंश शाश्वत आहे
सत्य सुंदर शाश्वतावर मनापासून प्रेम करूया
त्याचाच शोध घेऊया, त्यातच स्वतःला शोधूया
चला जीवनावर प्रेम करूया.3

कुणा कुणामध्ये किती किती दोष
कोणी किती त्रास दिला याची सदा उजळणी कशाला?
कितीजण सद्गुण घेऊन आले 
आपल्याला नवे गुण देऊन गेले
कितीजणांनी कर्तव्यपूर्तीचे आदर्श ठेवले
त्या आदर्श व्यवहारांवर प्रेम करूया.
आपण किती सुखद आठवणी देवून जाणार विचार करूया.
चला जीवनावर प्रेम करूया.4

कळते आपल्याला शब्दांमधले ,शब्दांच्या पलीकडले,
देहबोलीतून सारे मनातले, असा वृथा अभिमान कशाला?
एका शब्दांचे अर्थ अनेक
बोलणाऱ्याचे हेतू अनेक
प्रतिमेच्या पृष्ठभुमीचे पार अनेक
वेळ कमी आहे प्रत्येकाला प्रेम करूया
अहंकार ,संशय आणि पूर्वग्रहाला बाजूला ठेवूया
चला जीवनावर प्रेम करूया.5

किती मोठी शक्ती ! किती मोठ्या साधना!
त्यांचा प्रत्यय किती मोठा! किती मोठा कहाण्या!
विश्वाच्या ढिगार्‍यामध्ये आपले अस्तित्व कणाएवढे
काळाच्या चक्रामध्ये आपले अस्तित्व क्षणाएवढे
महाअजस्त्र यंत्रामध्ये आपण एका पिनाएवढे
आपल्या छोट्या भूमिकेवर प्रेम करुया
ती भूमिका छोटी किती याचे सदा भान ठेवूया
चला जीवनावर प्रेम करूया.6




Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)