पर्यावरण गीत २
अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे ।
जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे ।।
झाडे लावून जमेल तेथे ,पक्षी प्राणी जगवायाचे ।
शून्य कचरा-शुद्ध निचरा,वीज जपून वापरायाचे।।
अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे ।
जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे।।
आधी 'नको' म्हणायचे पॉलिथिनला ,
जर आले घरी तर पुन्हा वापरायचे ।
इकोsब्रिक्स बनवायचे पण, कचऱ्यामध्ये नाही मिसळायचे।।
अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे।
जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे।।
एक... तीन... दहा चे प्रमाण,
"बायोएन्झाइम" घरी बनवायचे ।
बीजांपासून रोप बनावे,हे काम गोड कौतुकाचे ।।
अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे ।
जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे ।।
अरे मनात-घरात तेच तेच ,शाळेत-देवळात तेच तेच।
अरे ,गाव-गल्ली, शहर-जिल्हे,या देशाचे नाव उजळायचे ।।
अवघड नसते सोपे असते, मातेचे ऋण फेडायाचे ।
जी जगविते सगळ्यांना, तिजसाठी थोडे जगायचे ।।
Comments
Post a Comment