जागला
जागला
हल्ली कुणाच्याही नावाने चौक असतात ,
कुणाच्याही नावाने रस्ते असतात ,
शाळा असतात, भवन असतात .
ते महान असतात,असा समज असतो,
पण ते तसे असतीलच असे मात्र नाही.
नेते समाजाचे 'सेवक' असतातच असे नाही,
बातम्या नेहमी खऱ्या असतात असेही नाही ,
ज्या मुद्द्यावर चर्चा होत असतात जोरदार...
ते महत्त्वाचे असतात असा समज असतो,
पण तसे ते असतीलच असे मात्र नाही.
चर्चेत भाग घेणाऱ्यांना विद्वान असे म्हणतात,
काहीजण वैचारिक गटांचे प्रवक्ते म्हणवितात,
ते आज एका गटात, उद्या दुसऱ्या गटात असू शकतात. देश-दुनिया-समाजसाठी हे गट बनतात असा समज आहे, पण तसे ते असतीलच असे मात्र नाही.
राजकीय पक्ष सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करतात म्हणे,
कळत नकळत कोण्या एका समाजाचे बनतात
समाजात फुट पाडून आपली पोळी भाजतात .
'विविधतेत एकता'असे सतत सांगत असतात,
पण त्यांना 'एकता' हवी असते असे मात्र मुळीच नाही.
आताशा हे कळू लागलेय सगळ्यांना
आता आपण का फसायचं?
खूप वेळा फसलो आत्तापर्यंत
ते कसं काय विसरायचं?
बदल करतो तो समाज असतो,
विकास करतो तो समाज करतो,
सोबत जगतो मरतो तो समाज असतो,
मग व्यक्ती आणि पार्टी च्या मागे कशाला धावायचं?
निष्ठा असू द्यावी संपूर्ण समाजासाठी,
या,काम करूया सारेजण संपूर्ण समाजासाठी,
त्यांनी वापरले आपल्याला आत्तापर्यंत स्वार्थासाठी,
आता आपण त्यांना वापरू या संपूर्ण समाजासाठी.
येतील काही समस्या अहंकाराच्या, मतभेदाच्या,
त्या अशा बाजूला ठेवायच्या.
येऊ नयेत आडवे कधी ठरवलेल्या कामाच्या.
कुणाकुणाची वेगळी असेल गती
कुणाची वेगळी असेल पद्धती,
कुणाची वेगळी असतील बलस्थाने,
कुणाच्या वेगळा असतील प्राथमिकता.
एकच 'तारा' समोर ठेवायचा
पृथ्वीमातेच्या आरोग्यासह...
संपूर्ण समाजासाठी सुख शांती समाधानाचा ,
अमुक एकच मार्ग योग्य आहे...
असा 'एकांत' कशाला ठेवायचा?
अमुक एकच मार्ग योग्य आहे...
असा 'एकांत' कशाला ठेवायचा?
Comments
Post a Comment